rajkiyalive

SANGLI BANK : शेतकर्‍याचे अनुदान लाटणार्‍या बँकेतील दरोडेखोरांना चौकात फटके मारा

SANGLI BANK : शेतकर्‍याचे अनुदान लाटणार्‍या बँकेतील दरोडेखोरांना चौकात फटके मारा : सांगली : शेतकर्‍यांना अवकाळी पावसाने दुष्काळाने झालेली नुकसान भरपाई तसेच कर्जमाफीचे मिळणारे अनुदान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्‍यांनी संगणमताने परस्पर हडप केलेले आहे. शेतकर्‍याचे अनुदान लाटणार्‍या बँकेतील दरोडेखोरांना चौकात फटके मारा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी केली आहे.

SANGLI BANK : शेतकर्‍याचे अनुदान लाटणार्‍या बँकेतील दरोडेखोरांना चौकात फटके मारा

ते म्हणाले, या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन यांच्याकडे सदर कर्मचार्‍यांना निलंबन न करता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकावे तसेच सदरची रक्कम अपहार केलेल्या दिवसापासून व्याजासहित वसूल करणे यावी व फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे. पुन्हा असा घोटाळा करण्याचे साहस कोणीही करणार नाही.

दुष्काळामुळे झालेली नुकसान भरपाई कर्जमाफीच्या रकमा बँकेच्या शाखेमध्ये पडून आहेत

एकीकडे शेतीमध्ये झालेल्या नुकसानीमुळे कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करत आहे प्रसंगी पोटाला चिमटा काढून बँकेमध्ये आपली पत वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच शेतकर्‍यांना मिळणारे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई किंवा दुष्काळामुळे झालेली नुकसान भरपाई कर्जमाफीच्या रकमा बँकेच्या शाखेमध्ये पडून आहेत काही ठिकाणी एकत्रित सातबारा असल्याने तांत्रिक अडचणी तसेच अंतर्गत वादा अथवा केवायसी अपूर्ण असल्यामुळे सदरच्या रकमा बँकेमध्ये पडून आहेत. खर्‍या अर्थाने बँकेने याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं होते.

जर वेळीच लक्ष ठेवलं असतं तर असा प्रकार घडला नसता

शेतकर्‍यांचे पैसे हडपने म्हणजे मेलेल्या मळ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यातला हा प्रकार आहे आधीच जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती असेल साखर कारखानदार उद्योजक यांना क्षमतेपेक्षा दिलेले अवास्तव कर्ज तसेच त्यांना दिलेला ओटीएस चा लाभ आशा विविध कारणाने गाजत आहे त्यातच भरीत भर म्हणून कर्मचार्‍यांनी गोरगरीब शेतकर्‍यांच्या अनुदानावर टाकलेला हा दरोडा म्हणजे कुंपणानेच शेत खाल्लेला प्रकार आहे बँकेत अजून बर्‍याच गडबडी आहेत योग्य वेळ येताच या सर्व गडबड करणार्‍यांच्या भानगडी आम्ही बाहेर काढू

स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल,

जिल्हा बँकेचे चेअरमन व कार्यकारी अधिकारी यांचेकडे वरील प्रमाणे मागणी केलेली आहे व त्यांनी कारवाईचे आश्वासन दिलेली आहे जर यामध्ये काही दुजाभाव आढळलेस जोपर्यंत आमच्या मागणीप्रमाणे कारवाई होणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असेही संदीप राजोबा यांनी म्हटले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज