rajkiyalive

खानापुरात कोणाची पॉलिटिकल ताकद होणार स्पष्ट?

जनप्रवास/प्रताप मेटकरी

खानापुरात कोणाची पॉलिटिकल ताकद होणार स्पष्ट? : विटा : सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार असून, त्याची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे. भाजपकडून संजयकाका पाटील, महाविकास आघाडीकडून पै. चंद्रहार पाटील तर अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. यामध्ये संजयकाका व विशाल पाटील यांच्यातच तुल्यबळ लढत झाल्याचे चित्र आहे. यामध्ये दोघांनीही विजयाचा दावा केला आहे.

खानापुरात कोणाची पॉलिटिकल ताकद होणार स्पष्ट?

मात्र ज्या खानापूर विधानसभा मतदारसंघावर लोकसभेचा निकाल अवलंबून होता त्याच मतदारसंघाची राजकीय गणिते 4 जुननंतर बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे 4 जूनला होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. खानापूर विधानसभा मतदारसंघात स्व. अनिल बाबर यांचा मोठा गट आहे. स्वर्गीय आ. अनिलभाऊंच्या निधनानंतर याची संपूर्ण धुरा त्यांचे पुत्र सुहास बाबर यांच्याकडे आली. बाबर हे सध्या शिंदे गटात आहेत. लोकसभेसाठी बाबर यांनी महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यामागे उभा राहण्याचे सांगितले असले तरी 4 जुननंतरच त्यांची ताकद दिसून येणार आहे.

विशाल पाटील हे निवडून आले तर खानापूर मतदारसंघातील चित्र नक्कीच बदलेल

सुहास बाबर हे आमदारकीच्या उतरणार आहेत. पण या मतदारसंघातून पाकीटाचे काम अनेकांनी केले असल्याचे बोलले जात असल्यामुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून आले तर खानापूर मतदारसंघातील चित्र नक्कीच बदलेल अशी शक्यता नाकारता येणार नाही. दुसरीकडे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील हे राष्ट्रवादीचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे.

वैभव पाटील यांनीदेखील संजयकाका पाटील यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केला.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात रान तापवलेले आहे. राष्ट्रवादीची मजबूत बांधणीही त्यांनी या माध्यमातून केली आहे. अजितदादा पवार हे देखील महायुतीत असल्याने वैभव पाटील यांनीदेखील संजयकाका पाटील यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केला. मात्र विट्यातील पाटील गटाच्या काही आजी-माजी नगरसेवकांनी विशाल यांना उघडपणे पाठिंबा देत प्रचारात सक्रिय होते. त्यामुळे त्यांच्या गटावर देखील प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. परिणामी त्यांची देखील बालेकिल्ला असणार्‍या विटा शहरातील ताकद काय आहे ? हे निकालानंतर समजणार आहे.

खानापुरात कोणाची पॉलिटिकल ताकद होणार स्पष्ट? : तानाजी पाटील गटाने देखील पाटील यांचेच काम केले असल्याची चर्चा आहे.

खानापूर मतदारसंघातील विट्यातील ही परिस्थिती असताना दुसरीकडे आटपाडीमध्ये काय होणार ? याची देखील चर्चा होती. तानाजी पाटील गटाने देखील पाटील यांचेच काम केले असल्याची चर्चा आहे. तसेच तानाजी पाटील यांनी घाटमाथ्यावरील नेत्यांना एकत्र आणत विशाल पाटलांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी केली असल्याचे बोलले जात आहे. स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर बाबर कुटुंबियांच्या पाठीमागे ते ठाम उभा असून सुहास बाबर जे निर्णय घेतील त्याला माझ्या सपोर्ट असेल, असे स्पष्ट केलेले असताना याही घडामोडी लोकसभेच्या निकालासाठी निर्णायक ठरणार आहेत.

खानापुरात कोणाची पॉलिटिकल ताकद होणार स्पष्ट? : ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील मतदारसंघात संपर्क वाढवलेला आहे.

भाजपचे फायरब्रॅण्ड नेते, स्टार प्रचारक आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील मतदारसंघात संपर्क वाढवलेला आहे. त्यांनी विधानसभेच्या आमदारकीचा शड्डू ठोकला आहे. संजयकाका पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामधील वाद हा मिटला असला तरी त्यांच्या लोकसभा निवडणुकीत खरोखरच संजयकाकांना बळ दिलय का ? हे देखील स्पष्ट होणार आहे.

निकालानंतर खानापूर मतदारसंघातील राजकीय गणिते मात्र पूर्णपणे बदलणार असल्याचे चित्र आहे.

एकंदरीत सांगली लोकसभेच्या निकालानंतर खानापूर मतदारसंघातील राजकीय गणिते मात्र पूर्णपणे बदलणार असल्याचे चित्र आहे. विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेले नेते हे एकत्र येऊन तिसरी आघाडीदेखील करू शकतात अशी शक्यता आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेसाठी काँग्रेसकडून कदम यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे या तिसर्‍या आघाडीची भूमिका हीदेखील या खानापूर मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे. मात्र 4 जूनच्या निकालानंतरच पुढची राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज