जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली ः महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात लव्ह जिहाद फैलावत आहे. हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही एक लाखाहून प्रकरण उघडकीस आली आहेत. महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गो-हत्यावरील कायदे केले तर हिंदुवर होणारे अत्याचार रोखता येतील, असा विश्वास तेलंगणाचे आमदार राजा सिंह यांनी व्यक्त केला.
LOVE JIHAD : महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात कायदा करा
आमदार राजा सिंह, सांगलीत हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा
सांगलीत सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आल्यानंतर राम मंदिर चौकात तेलंगणाचे आमदार राजा सिंह, धारकरी सागर बेग यांनी मार्गदर्शन केले. आ. राजा सिंह म्हणाले, देशात गेल्या काही वर्षापासून लव्ह जिहादचे प्रकार वाढत आहेत. महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र हिंदू समाज इज्जतीला जपत असल्याने तक्रार करीत नसल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र सुरक्षित राहिला तर प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहिल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा कायदा केला, त्यामुळे तेथील प्रकार थांबले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लव्ह जिहादचे प्रकार रोखावा. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गो-हत्याबंदी विरोधात कायदा करुन हिंदुचे रक्षण करण्याची गरज आहे.
आपल्याकडे मते मिळविण्यासाठी रंग बदलणारे नेते आहेत.
परंतु हिंदुंच्या रक्षणासाठी डुप्लीकेट नेता नको आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर हल्ला आणि अत्याचार करणार्यांविरोधात उभा राहणारा आम्हांला नेता पाहिजे. त्यामुळे तिसर्या वेळीही भगवाधारीच देशाचा पंतप्रधान बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हिंदुप्रमाणे मुस्लिम समाजाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदा करण्यााची मागणी करणार आहे.
भारत हिंदु राष्ट्र बनणार आहे. 2025-26 मध्ये देशाची वाटचाल हिंदू राष्ट्राकडे सुरु होईल,
त्यावेळी हिंदूंवर मुस्लिमांचे हल्ले होतील. ते हल्ले रोखण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही आ. राजा यांनी केले. सागर बेग म्हणाले, हिंदू समाज जागृत नसल्याने लव्ह जिहादसारख्या घटना घडत आहेत. आमच्या मुलींवर अत्याचार, बलात्कार करीत असतील तर त्यांना शिवाजी महाराजांच्या कायद्याप्रमाणे हिसका दाखवावा लागेल. वक्व बोर्डाचे जमीन दहा हजार एकरावरुन 10 लाख हेक्टरवर पोहोचली. महाराष्ट्रात 1 लाख 20 हजार हेक्टरवर वक्व बोर्डाची जमीन आहे. हिंदुवरील अन्याय रोखण्यासाठी वक्व बोर्डाला अनुदान देण्याचा कायदा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
हिंदू समाजाच्या मोर्चातील मागण्या
– लव्ह जिहाद रोखणारा कायदा लागू करावा
– नेहा हिरेमठच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी.
– लव्ह जिहादप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत खटला चालवून मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी.
-सांगलीतील वक्व बोर्डाला देण्यात आलेली गायरान जमीन सरकारने काढून घ्यावी.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.