rajkiyalive

व्हिजनरी नेतृत्व…सुरेश पाटील

DINESHKUMAR AITAWADE  9850652056

व्हिजनरी नेतृत्व…सुरेश पाटील : सोन्याच्या चमचा तोंडात घेवून जन्माला येवूनही समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी असणारी व्यक्ती निराळीच. मिरज तालुकयातील समडोळी येथील सुरेश जिनगोंडा पाटील उर्फ दाजी यांचे नाव त्यामध्ये अग्रभागी घ्यावी लागेल. माजी जिल्हा परिषद सदस्य असणार्‍या सुरेश पाटील यांची व्हिजन असणारे नेतृत्व अशी सर्वत्र ओळख आहे. एक व्हिजनरी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

व्हिजनरी नेतृत्व…सुरेश पाटील

समडोळी सारखा सधनशील गावामध्ये पाटलांच्या घरात सुरेश यांचा जन्म झाला. सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्या सुरेश पाटील यांना कशीचीही कमतरता नव्हती. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर 1992 मध्ये सांगली जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांच्या काळात त्यांना माणिकआबा पाटील बोरगाव, विलासराव जगताप जत, खंडेराव जगताप अशी जिवाभावाचे साथीदार मिळाले. आजही त्यांची दोस्ती अबाधीत आहे.

जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना समडोळी अनेक मोठी काम केली. त्यानंतर सातत्याने ते समडोळी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत आहेत. सध्या त्यांच्याकडे समडोळी शिक्षण संस्था, समडोळी ग्रामपंचात या स्थानिक स्वराज्य संस्था असून, समडोळी विकास सोसायटी आणि शांतीसागर के्रडीट सोसायटी या सहकारी संस्था ताब्यात आहेत.

संस्था केवळ मिरवण्यासाठी नसून गोरगरीब, दीनदलितांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ते सतत झटत असतात. त्यांनी स्थापन केलेल्या शांतीसागर क्रेडीट सोसायटीचा आज जिल्ह्यात दबदबा आहे. त्यांच्या दूरदृष्टीने आणि वेगळ्या व्हिजनने आज संस्थेचे मोठे नाव झाले आहे. ते चेअरमन असलेल्या समडोळी शिक्षण संस्थेकडेही एक आदर्श संस्था म्हणून पाहिले जाते. यंदाही त्यांच्या शाळेतील दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. केद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजनेतून त्यांनी शाळेला चांगले रूप आणले आहे.

नियतीला हरविले…

संस्कारी आई बापाच्या पोटी जन्म घेवून जगात सर्वांशी मिळून मिसळून वागत, आपल्या श्रीमंतीचा प्रभाव आपल्या वागणुकीवर न पाडता एक चांगला माणूस म्हणून जगण्यात जो आनंद असतो, तो आनंद घेत आयुष्य जगणारे असे हे सुरेश पाटील. नावाप्रमाणेच आयुष्य एका सुरेख अशा सरळ रेषेत गेले असते तर या हिरोची कामगिरी एक सरळ रेषेचीच झाली असती. पण, आयुष्यानं दिलेली दुसरी संधी ही सुरेश पाटील यांची सर्वात मोठी यशोगाथा. सगळं काही सुखानं चाललं असताना एक दिवस अचानक समजतं की कॅन्सर दबा धरून आपल्या अन्ननलिकेत बसलायं. सुखानं चार घास खायच्या वयात असे आव्हान निर्माण होणं हे गंभीरच. पण चांगुलपणा आणि पूर्वपुण्याई, धार्मिक वृत्तीचा पिढ्यानपिढ्याचा वारसा याच्या जोरावर यावर मात करणं शक्य होतं. आणि मृत्यूलाही जिंकून पुन्हा उभं राहता येतं हे या नायकानं दाखवून दिले.

शांतीसागर सोसायटी ठरली आयुष्यातील मैलाचा दगड

शांतीसागर को ऑप के्रडीट सोसायटीमुळे त्यांना काम करण्याची आणखी हुरूप आला. या संस्थेची स्थापना त्यांनी केलीच परंतु आज या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 15 मे 2005 रोजी त्यांनी शांतीसागर को. ऑप के्रडीट सोसायटीची स्थापना केली. आज संस्थेला 19 वर्षे पूर्ण झाले आहेत. सध्या संस्थेचे कामकाज 5 शाखांमधून सुरू आहे. संस्थेकडे 63 कोटीच्या ठेवी असून, 47 कोटी रूपये कर्ज वाटप झाले आहे. स्वनिधी 5 कोटी 48 लाख रूपये असून, संस्थेला यावर्षी ढोबळ नफा 1 कोटी 58 लाख रूपयाचा झाला आहे. त्यातील निव्वळ नफा 80 लाख रूपये आहे. कर्ज वसुली 98 टक्के आहे. संस्थेमार्फत एन. एफ.टी. आरटीजीएस. एस. एम. एस. अशा आधुनिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.

संस्था फक्त आर्थिक क्षेत्रात कार्य न करता सामाजिक क्षेत्रातही नेहमी अग्रेसर आहे. संस्थेने गरीब व होतकरू हुशार विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. त्याचप्रमाणे जीवन मंगल ट्रस्ट सांगली यांना प्रतिवर्षी 25 हजाराची देणगी दिली जाते. महापूर, कोव्हीड काळातही संस्थेने अनेक सामाजिक संस्थांना देणगी दिलेली आहे. संस्थेस आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामध्ये अविज पब्लिकेशन यांचा बँको पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडेशन यांचा दीपस्तंभ पुरस्कार, सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांचा आदर्श पतसंस्था पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे.

आपल्या आयुष्याची रेषा उंचावून तेे आज वाढदिवस साजरा करीत आहेत. हा वाढदिवस केवळ वाढदिवस नाही, एक आनंदाची गोष्ट आहे. हिंमत हरायची नाही, जगणं सोडायचं नाही. हे जर पक्क ठरवलं तर जीवन सुध्दा साथ देतं. आयुष्य साथ देते. आणि तुमच्या आमच्या सारख्या मित्रंमंडळींनी आयुष्य कसे जगायचे याची शिकवण मिळते. जीवनाची लढाई जिंकलेल्या सुरेश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज