rajkiyalive

तासगावजवळ वाढदिवस करून परतत असताना तासगावजवळ कार कॅनॉलमध्ये कोसळून सहा ठार

जनप्रवास प्रतिनिधी
तासगाव :

तासगावजवळ वाढदिवस करून परतत असताना तासगावजवळ कार कॅनॉलमध्ये कोसळून सहा ठार : कोकळे येथे आपल्या नातीचा वाढदिवस करून साजरा करून तासगावला येत असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला झाला. चालकाचा ताबा सुटून चारचाकी कॅनलमधे कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तासगाव मणेराजुरी महामार्गावर चिंचणी गावच्या हद्दीत बुधवारी झाला.

तासगावजवळ वाढदिवस करून परतत असताना तासगावजवळ कार कॅनॉलमध्ये कोसळून सहा ठार

दैव बलवत्तर म्हणून स्वप्नाली विकास भोसले या अपघातात बचावल्या. त्यांच्यावर तासगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मयत झालेल्यांमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 56), त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (वय 52), रा. तासगाव, मुलगी प्रियंका अवधूत खराडे (वय 33), नात दुर्वा अवधूत खराडे (वय 5), दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे ( वय 1), सर्व रा. बुधगाव व राजवी विकास भोसले (वय 2) रा. कोकळे यांचा समावेश आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबा समवेत अल्टो (एमएच 10 ए एन 1497) गाडीतून कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस झाल्यानंतर वाढदिवस झालेली आपली नात, लेक व दोन अन्य नातींसह कुटुंबीयांसमवेत तासगावला परत येत होते. राजेंद्र हे गाडी चालवत होते. तासगाव जवळ आल्यानंतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कॅनल जवळ त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला व काही कळायच्या आत गाडी कॅनलमधे कोसळली.

मध्यरात्र असल्याने गाडीतील बाकीची मंडळी झोपेत होती. काही कळायच्या आताच जोराचा दणका बसला. खडबडून जागे व्हायच्या आतच त्यांच्यावर काळाचा घाला झाला.

अपघात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला होता. मात्र कॅनल खोल असल्याने व लोकांच्या लक्षात आले नाही. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तासगाव पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात नेले.

अपघाताचे घटना समजतात कुटुंबीयांनी तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. समोरचे मृतदेह पाहताच कुटुंबीयांचा आक्रोश व किंकाळ्यांनी उपस्थित मंडळींचे हृदय हेलावून गेले. तासगाव शहरासह तालुक्यात या घटनेने शोककळा पसरली.

मुलांचा गुदमरून मृत्यू:

अपघात हा इतका भयानक होता की मयत राजेंद्र पाटील त्यांच्या पत्नी सुजाता पाटील यांचा मृतदेह कार्तिकी व राजवी या दोघींच्या अंगावर पडले होते. त्यांना अंगावर साधे खरचटलेही नव्हते. मात्र मृतदेह अंगावर पडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे बोलले जात होते.

मृतदेहासोबत काढली रात्र:

अपघातात प्रियंका अवधूत खराडे हिला डोके फुटून गंभीर दुखापत होत ती रक्ताच्या थारोळ्यात गाडीत अडकून पडली होती. कॅनल मधून बाहेर काढण्यासाठी ती लोकांना वाचवा म्हणून हाका देत होती. मात्र कॅनल खूप खोलवर असल्याने व तिचा आवाज वरपर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांना हा अपघात निदर्शनास आला त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र प्रियांकाला मृतदेहांसोबतच रात्र काढावी लागली.

काही तासाचाच आनंद:

मंगळवारी राजवीचा दुसरा वाढदिवस. सारे कुटुंब आनंदात होते. वाढदिवस झाला. आजोबासह सुट्टीला निघालेल्या राजवि आणि तिच्या कुटुंबावर ती रात्र काळरात्र होत कोसळली. काही तासाचा आनंदाचं दुःखात रूपांतर झालं.

पोहोचल्याचा फोन का झाला नाही?

वृद्धासह लहान मुले संध्याकाळी उशिरा प्रवास करत आहेत. ती तासगाव मध्ये पोहोचली का याबाबत कोकळे, बुधगाव किंवा तासगाव या कुटुंबातील एकाने तरी फोन केला असता तर अपघाता विषयी त्यांना माहिती मिळाली असती. शोध सुरू झाला असता व गाडीतील इतरांना वैद्यकीय मदत मिळाली असती. मात्र कुणाचाच पोहोचल्याचा फोन का झाला नाही याविषयी घटनास्थळी चर्चा सुरू होती.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज