rajkiyalive

loksabha result : मतमोजणीला उरले 48 तास: उत्कंठा शिगेला

जनप्रवास । सांगली

loksabha result : मतमोजणीला उरले 48 तास: उत्कंठा शिगेला : सांगली लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता मतमोजणीला केवळ 48 तास बाकी लागले असून उमेदवार व कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला लागली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी देखील पूर्ण झालेली आहे.

loksabha result : मतमोजणीला उरले 48 तास: उत्कंठा शिगेला

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी दि. 7 मेला मतदान प्रक्रिया पार पडली. लोकसभेसाठी वीस उमेदवार निवडणुकीत रिंगणात होते. प्रामुख्याने भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली होती. मतमोजणी मंगळवार दि. 4 रोजी होणार आहे.

मतमोजणीला अवघे 48 तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मतदारांना आता मजमोजणीचे वेध लागले आहेत. प्रशासनाने मतमोजणीची तयारी देखील पूर्ण केली आहे. मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक, एक सुक्ष्म निरीक्षक आणि एक शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोस्टल मतांची मोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी प्रत्येक टेबलवर एक एआरओ, एक सुपरवायझर, दोन सहायक व एक सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ईटीपीबीएस मतांची मोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी दोनAएआरओ व प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक, एक सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याखेरीज 20 टक्के अतिरिक्त अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मतमोजणीच्या अन्य अनुषंगिक कामकाजासाठी आवश्यक अधिकारी कर्मचार्‍यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाची जरी तिरंगी निवडणूक असली तरी भाजपचे खासदार संजयकाका पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून कोणाला किती मताधिक्य मिळणार? याची चर्चा आता नेते, कार्यकर्ते करू लागले आहेत. निवडणुकीत कोण निवडून येणार यावर पैजा लागल्या आहेत. काहींनी गुलाल, डॉल्बी, फटाक्यांचे बुकिंग देखील केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, अपक्ष उमेदवार प्रकाश शेंडगे किती मते घेणार? याची चर्चा देखील आता सुरू झाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज