rajkiyalive

loksabha election : मतमोजणीसाठी प्रतिनिधी नेमले आहेत; अफवा नको: संजय विभूते

जनप्रवास । सांगली

loksabha election : मतमोजणीसाठी प्रतिनिधी नेमले आहेत; अफवा नको: संजय विभूते : महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मतमोजणीसाठी प्रतिनिधी मिळाले नसल्याची अफवा आहे. मतमोजणीसाठी शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रतिनिधींची नेमणूक केली आहे. त्यांना अधिकृत ओळखपत्र देखील मिळाले असल्याचा खुलासा शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केला.

loksabha election : मतमोजणीसाठी प्रतिनिधी नेमले आहेत; अफवा नको: संजय विभूते

सांगलीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंत चर्चा रंगली होती. शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेत सभा घेऊन महाविकास आघाडीतील घटक पक्षाला न विश्वासात न घेता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष नाराज झाला होता. त्याचाच परिणाम म्हणून ठाकरे यांच्या मिरजेतील सभेला घटक पक्षातील कोणीही हजर नव्हते. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगलीची जागा प्रतिष्ठेची केली. चार दिवस सांगलीत तळ ठोकला होता. महाविकास आघाडीमध्ये उमेदवार निवडताना समन्वयाचा अभाव दिसून आला.

तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे एकदिलाने काम करावे. चंद्रहार पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. नौटंकी करू नये, असा इशारा देखील दिला होता. शरद पवार यांची सभा देखील चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी झाली होती. शिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी चंद्रहार पाटील यांचा जोरदार प्रचार केला होता. मात्र काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात काँग्रेसची टीम कार्यरत होती. तर अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते देखील विशाल पाटील यांच्या प्रचारात होते. त्यामुळे महविकास आघाडीत बिघाडी झाली होती.

निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. या मतमोजणीसाठी चंद्रहार पाटील यांनी प्रतिनिधी दिल्या नसल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यामुळे शनिवारी शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख यांनी पत्रकारांशी बोलताना खुलासा केला आहे. ते म्हणाले, मतमोजणीसाठी प्रतिनिधी नेमले नसल्याच्या अफवा आहेत. मतमोजणीसाठी शिवसेना (उबाठा) गटाचे प्रतिनिधी नेमले आहेत. त्यांना जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत ओळखपत्र देखील मिळाले आहेत. त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. प्रतिनिधींनी मतमोजणीसाठी जावे, असे आवाहन संजय विभूते यांनी केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज