rajkiyalive

RAJU SHEETI : बळ कमी झाले असताना शेट्टींचा स्वबळाचा आत्मघातकी निर्णय

दिनेशकुमार ऐतवडे, समडोळी

RAJU SHEETI : बळ कमी झाले असताना शेट्टींचा स्वबळाचा आत्मघातकी निर्णय : गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. संघटनेचे महत्वाचे शिलेदार संघटना सोडून चालले होते. संघटनेला कार्यकर्त्यांची वाणवा भासत होती. अशातच बळ कमी झालेले असताना स्वबळावर लढण्याचा आत्मघातकी निर्णय राजू शेट्टींनी घेतला आणि येथेच त्यांचा घात झाला.

RAJU SHEETI : बळ कमी झाले असताना शेट्टींचा स्वबळाचा आत्मघातकी निर्णय

2009 पासून शेतकर्‍यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना 2024 च्या लोकसभेला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. यामध्ये अनेक कारणे असली तरी बळ कमी झाले असताना एकला चलो रे ची भूमिका घेणे ही त्यांची राजकीय आत्महत्त्या केल्यासारखे झाले.

खोत यांच्या पाठोपाठ अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले.

RAJU SHEETI : बळ कमी झाले असताना शेट्टींचा स्वबळाचा आत्मघातकी निर्णय : 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या साथीने त्यांनी धुमधडाक्यात विजयश्री खेचून आणली होती. त्यानंतर राज्याच्या सत्तेत सहभागी होत आपले शिलेदार सदाभाउ खोत यांना विधानपरिषदेवर आणि रविकांत तुपकर यांना महामंडळ त्यांनी मिळवून दिले. भाजप आघाडीतून ते बाहेर पडले. परंतु आमदार आणि मंत्री झालेल्या सदाभाउंनी भाजपबरोबर राहणेच पसंत केले. खोत यांच्या पाठोपाठ अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेस आघाडीशी संधान साधले. त्यावेळीही वातावरण अजून भाजपमयच होते. परंतु वादळात दिवा लावायचा प्रयत्न त्यांनी केला. संपूर्ण राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. शेट्टींनाही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांनी काँग्रेस आघाडीचीही साथ सोडली.

2024 ची निवडणूक लागल्यावर त्यांच्या सल्लागारांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्या, असे सांगितले.

त्याप्रमाणे त्यांनी आपली वाटचाल स्वतंत्र ठेवली. आणि येथेच त्यांचा घात झाला. कारण पूर्वी सारखी त्यांची आता यंत्रणा राहिली नव्हती. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्ते होते. दुसर्‍या फळीत सावकार मादनाईक सोडले तर कोणीही कार्यकर्ते नव्हते. त्याचबरोबर स्टेज सांभाळणारे वक्तेही कोणी नव्हते. प्रत्येक ठिकाणी राजू शेट्टींनाच आपली भूमिका पटवून द्यावे लागत होते. नवख्या उमेदवारांसारखी त्यांची अवस्था झाली होती.

सहाही मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीने आपआपली संस्थांने ताब्यात घेतली होती.

त्यामुळे हक्काची अशी मते त्यांच्याकडे राहिली नव्हती. होमपीच असणार्‍या शिरोळ मतदार संघातही त्यांनी उल्हास पाटील, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, अशोकराव माने, माधवराव घाटगे यांना त्यांनी उघडउघड अंगावर घेतले. त्यामुळे त्यांना शिरोळ मतदार संघात तिसर्‍या क्रमांकावर राहिले.

निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव ‘हातकणंगले’तील निवडणूक शेट्टी हे एकतर्फी मारतील, असेच वातावरण होते. मात्र, मागील तीन निवडणुकांप्रमाणे यावेळेलाही सामान्य माणूस आपल्यासोबत राहील, या आत्मविश्वासाने आघाडीने दिलेला हात अक्षरश: लाथाडला आणि तिथेच शेट्टींचा घात झाला.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित व्हायच्या अगोदर ‘हातकणंगले’राजू शेट्टींना सोडूनच चर्चा सुरू होती.

ही जागा शेट्टींना सोडायचीच म्हणून तिथे आघाडीकडून उमेदवाराचीही तयारी केली नव्हती. शेट्टी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे व काही काँग्रेस नेत्यांशी चर्चाही केल्या होत्या. धैर्यशील माने यांच्याबद्दलची नाराजी आणि आघाडीची ताकदीमुळे येथे शेट्टी एकतर्फी निवडणूक मारणार, हे निश्चित होते. पण, मागील निवडणुकीत आघाडीसोबत गेलो आणि पराभव झाला.

साखर कारखानदारांसोबत गेल्याने आपला पराभव झाल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली.

आघाडी व महायुतीपासून समान अंतरावर असल्याचे सांगून त्यांनी शेतकर्‍यांची सहानूभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, येथेच त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला. दोन्ही कॉग्रेसचे नेते अधिक आक्रमक झाले, कोणत्याही परिस्थित उध्दवसेनेने येथे उमेदवार द्यावा, असा आग्रह धरला. त्यातूनच सत्यजीत पाटील-सरुडकर यांचा पत्ता उध्दव ठाकरे यांनी काढला आणि बघता बघता ‘हातकणंगले’चे वारे फिरले.

विशेष म्हणजे सरुडकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या विजयाचे भाकीत केले जात होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्या आठवड्यात सरुडकर आणि शेट्टी यांच्या मध्येच फाईट राहिली; पण शेवटच्या टप्यात धैर्यशील माने यांनी लावलेल्या जोडण्यांमुळे शेट्टी तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज