rajkiyalive

मिरज पश्चिम भागात राजू शेट्टींच आघाडीवर

दिनेशकुमार ऐतवडे

मिरज पश्चिम मागात राजू शेट्टींच आघाडीवर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांचा पुन्हा एकदा पराभव झाला. त्यांना संपूर्ण मतदार संघात कमी मते पडली असली तरी त्यांचा पारंपरिक मतदार असलेल्या मिरज पश्चिम भागात मात्र यांनी आघाडी घेतली आहे. मिरज पश्चिम भागातील समडोळी, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज आणि तुंग या सर्व गावांच्या मतांची बेरीज केली तर राज्ाू शेट्टी यांना 12001 मते, धैर्यशील माने यांना 9377 तर सत्यजित पाटील सरूडकर यांना 9297 मते पडली. राजू शेट्टी यांनी 2624 मतांची आघाडी घेतली आहे.

मिरज पश्चिम भागात राजू शेट्टींच आघाडीवर

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मिरज पश्चिम भागातील आठ गावात अपेक्षेप्रमाणे राजू शेट्टी यांनी बाजी मारली आहे. समडोळी, सावळवाडी, दुधगाव, माळवाडी आणि मौजे डिग्रज या गावात राजू शेटटी यांनी लीड घेतली असून, कवठेपिरानमध्ये धैर्यशील माने पहिल्या नंबरवर आहेत. तर तुंग आणि कसबे डिग्रजमध्ये सत्यजित पाटील सरूडकर हे पहिल्या स्थानावर आहेत. एकूण मिरज पश्चिम भागातील या आठ गावात राजू शेट्टी यांना 12001 मते पडली आहेत तर धैर्यशील माने यांना 9377 तर सत्यजित पाटील सरूडकर यांना 9297 मते पडली आहेत.

कवठेपिरानमध्ये भीमराव मानेच किंग

मिरज पश्चिम भागातील मोठे गाव असलेल्या कवठेपिरामध्ये भीमराव मानेच किंग ठरले आहेत. या आठही गावांची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमराव मााने यांच्यावर सोपवली होती. त्यांच्या स्वतच्या गावात धैर्यशील माने यांना 2916 मते पडली आहेत तर सत्यजित पाटील सरूडकर यांना 1980 मते पडली आहेत. येथे राजू शेट्टी यांना 1216 मते पडली आहेत.

कसबे डिग्रजमध्ये नलवडेंची जादू

तालुक्यातील आणखी एक मोठे गाव असणार्‍या कसबे डिग्रजमध्ये बाजार समितीचे सदस्य जयंतराव नलवडे यांच्या पुढाकाराने सत्यजित पाटील सरूडकर यांनी आघाडी घेतली आहे. येथे सरूडकरांना 2753 मते पडली असून, धैर्यशील माने यांना 2436 तर राजू शेट्टी यांना 1847 मतावर
समाधान मानावे लागले आहे.

दुधगाव, समडोळीमध्ये राजू शेट्टीच

तुलनेने मोठे असणार्‍या दुधगाव, समडोळीमध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे राजू शेट्टी यांनीच आघाडी घेतली आहे. दुधगावमध्ये राजू शेटटी यांना 2865, धर्यशील माने यांना 988 तर सत्यजित पाटील यांना 1420 मते मिळाली. दुधगावमध्ये बाबा सांद्रे, भरत साजणे, गिरीश पाटील, मयूर पाटील, सुभाष समगोंडा, अक्षय गुरव, सतीश पाखरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर

समडोळीतध्ये संजय बेले, दीपक मगदूम, राहूल कोळी, दस्तगिर मुजावर यांनी राजू शेटटी यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. समडोळीमध्ये राजू शेटटी यांना 2576, धैर्यशील माने यांना 1106 तर सत्यजित पाटील यांना 828 मते मिळाली.
सावळवाडी, माळवाडी या लहान गावातही राजू शेट्टींचा करिष्मा कायम राहिला. सावळवाडीमध्ये राजू शेट्टींना 727, धेर्यशील मानेंना 133 तर सत्यजित पाटील सरूडकरांना 289 मते मिळाली. माळवाडीमध्ये एकच बुथ होतेे. येथे राजू शेटटी 460, सत्यजित पाटील यांना 193 तर मानेंना 67 मते मिळाली.

तुंगमध्ये भास्कर पाटील यांनी चांगले काम केले.

येथे सत्यजित पाटील यांना 1158. धैर्यशील मानेंना 1133 तर राजू शेट्टींना 986 मते मिळाली. मौजे डिग्र
एकंदरीत गेल्या चारही निवडणुकीप्रमाणे यंदाही मिरज पश्चिम भागातील आठही गावाचा विचार केला तर एकूण मतदानात राजू शेट्टी यांनी 12001 मते घेवून आघाडी घेतली तर धैर्यशील माने यांनी 9377 आणि सत्यजित पाटील सरूडकर यांनी 9297 मते घेवून दुसर्‍या स्थानावर राहिले.
शेतकरी संघटनेमुळे नावारूपाला आलेल्या मौजे डिग्रजमध्येही राजू शेट्टी यांनीच आघाडी घेतली. येथे राजू शेट्टी यांना 1324, धैर्यशील मानेंना 598 तर सत्यजित पाटील सरूडकरांना 676 एवढी मते मिळाली.

संपूर्ण इस्लामपूर मतदार संघात राज्ाू शेट्टींना 38 हजार 806 मते मिळाली त्यापैकी 12001 एवढी मते मिरज पश्चिम भागातून मिळाले. एकंदरीत या भागात राजू शेट्टी यांनी आघाडी घेतली असली तरी सत्यजित पाटील, धैर्यशील माने यांनीही त्यांच्या पाठोपाठ मते घेतली आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज