rajkiyalive

SANGLI MURDAR : रागाने बघितल्याच्या कारणातून भेंडवडेच्या तरुणाचा सांगलीत निर्घृण खून :

12 तासात तिघांच्या आवळल्या मुसक्या : दगडाने ठेचले डोके.

सांगली :

SANGLI MURDAR : रागाने बघितल्याच्या कारणातून भेंडवडेच्या तरुणाचा सांगलीत निर्घृण खून : : शहरातील संजयनगर परिसरातील राजीवनगर येथे रागाने बघितल्याच्या क्षुल्लक कारणातून रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केला. मयुरेश यशवंत चव्हाण (वय 30 रा. भेंडवडे ता. हातकणंगले) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

SANGLI MURDAR : रागाने बघितल्याच्या कारणातून भेंडवडेच्या तरुणाचा सांगलीत निर्घृण खून :

आज सकाळी आठच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली आणि शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, संजयनगर पोलिसांनी तत्काळ तिघांना अटक केली आहे. प्रतिक रामचंद्र शितोळे (वय 23, शामनगर, कुपवाड), गणेश ज्योतिराम खोत (वय 30, माळी गल्ली, संजयनगर), सिद्धनाथ राजाराम लवटे (वय 25, माळी गल्ली, मूळ रा. एरळे, ता. कवठेमहांकाळ) अशी त्यांची नावे आहेत. रागाने बघून शिवीगाळ केल्याच्या कारणातून खून केल्याची कबुली तिघांनी दिली आहे. दरम्यान, मृत मयुरेश याचे मामा हणमंत शिंदे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

गेल्या दीड वर्षांपासून कामानिमित्त संजयनगर परिसरातील पंचशिलनगर मध्ये राहत होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत मयुरेश चव्हाण हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे गावचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून कामानिमित्त संजयनगर परिसरातील पंचशिलनगर मध्ये राहत होता. चव्हाण हा नंदादीप रुग्णालयात काम करत होता. सोमवार दि. 10 जून रोजी मयुरेश हा त्याच्या मोटरसायकलवरून निघाला होता. कॉलेज कॉर्नर ते रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या रोडवर त्याची दुचाकी आली असता संशयित तिघांसोबत रागाने बघण्याच्या कारणातून वाद झाला यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती.

यानंतर सदरचे भांडण मिटले. पुन्हा ते दारू पिण्यासाठी मृत मयुरेश याच्या सोबत संशयित तिघेजण निघाले होते.

संजयनगर परिसरातील राजीवनगर येथून निघाले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी मोटरसायकल रस्त्यात अडवून तिघा हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून पाच वर्मी घाव करत तेथून पलायन केले. गंभीर जखमी झालेला मयुरेश हा त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला. अतिरिक्त स्त्राव मुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास सदर खुणाची घटना निदर्शनास आली. याची माहिती मिळताच संजय नगर पोलिसांनी पथकांसह घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांच्या तपासाकरीता श्वानपथकाला बोलावण्यात आले होते.

संशयितांना ताब्यात घेतले असता सदरच्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली.

श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक टिमनेही घटनास्थळी पंचनामा केला घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली. संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती. संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला सदरचा खून हा तिघा संशयितांनी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेतले असता सदरच्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

12 तासात संशयित गजाआड : दोघे रेकॉर्डवरील.

खुनाचे नेमके कारण प्राथमिक तपासात समोर आले नव्हते. संजयनगरसह स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके संशयिताच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. संजयनगर पोलिसांना खबर्‍यांमार्फत मिळालेल्या माहिती आधारे तिघांना 12 तासात अटक केली. बयाजीराव कुरणे यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार सुरज सदामते, विनोद साळुंखे, नवनाथ देवकते, अशोक लोहार, दीपक गायकवाड, सुशांत लोढे यांचा कारवाईत सहभाग होता. संशयित गणेश खोत याच्यावर कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात ङ्गआर्म क्टङ्खचा गुन्हा दाखल आहे. तर प्रतिक शितोळे याच्यावर शहर पोलिस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती निरीक्षक कुरळे यांनी दिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज