rajkiyalive

SANGLI BANK :जिल्हा बँकेत अनिल बाबर यांची रिक्त जागा भरणार : सुहास बाबर संचालक होणार

जनप्रवास । सांगली

SANGLI BANK :जिल्हा बँकेत अनिल बाबर यांची रिक्त जागा भरणार : सुहास बाबर संचालक होणार : सांगली ः जिल्हा बॅँकेचे संचालक आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन संचालकाची नियुक्ती करण्यासाठी बॅँकेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्राधिकरणच्या मंजुरीनंतर नवीन संचालकाची निवड केली जाणार आहे. या जागेवर आ. बाबर यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांची निवड होणार आहे.

SANGLI BANK :जिल्हा बँकेत अनिल बाबर यांची रिक्त जागा भरणार : सुहास बाबर संचालक होणार

जिल्हा बॅँकेचे संचालक आ. अनिल बाबर यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. बाबर हे खानापूर तालुका विकास सोसायटी गटातून जिल्हा बॅकेचे संचालक होते. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या जागेवर नवीन संचालकाची निवड करण्यासाठी जिल्हा बॅँकेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला. प्राधिकरण या जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक कार्यक्रम घोषित होईल. बॅँकेच्या संचालक मंडळाची बैठकीतच ही निवड होणार आहे.

बॅँकेच्या संचालक मंडळाने एकमताने या जागेवर आ. बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुहास बाबर यांची जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळावर निवड निश्चित आहे. जिल्हा बॅँकेने या निवडीसाठी थेट राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र प्राधिकरणाने कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्याची सुचना केली आहे. त्यानुसार हा प्रस्ताव येत्या दोन दिवसात पाठवला जाणार असून पुढील आठवडयात ही निवड होण्याची शक्यता आहे.

दोनपेक्षा जादा अर्ज आल्यास संचालक करणार मतदान

जिल्हा बॅँकेच्या रिक्त जागेवर नवीन संचालकाची निवड करण्यासाठी प्राधिकरणाने नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी संचालक मंडळाची बैठक बोलावतील. ज्या गटातील जागा रिक्त झाली आहे. तेथील उमेदवारच यासाठी अर्ज करु शकतात. एका जागेसाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास संचालक मंडळात मतदानाने निवड केली जाईल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज