rajkiyalive

KHANAPUR-ATPADI : आमदार व्हायचं असेल तर वैभवदादा शिवसेनेत या

जनप्रवास/विटा

KHANAPUR-ATPADI : आमदार व्हायचं असेल तर वैभवदादा शिवसेनेत या : खानापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढविणार आहे. आमच्या पक्षाचा आमदार व्हावा, ही माझ्या पक्षाची एक जागा सांगली जिल्ह्यात वाढावी या उद्देशाने मी पक्षाच्या विचारधारेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे थांबायला तयार आहे. वैभवदादांना आमदार व्हायचं असेल तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यावे, अशी जाहीर खुली ऑफर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

KHANAPUR-ATPADI : आमदार व्हायचं असेल तर वैभवदादा शिवसेनेत या

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूतेनी दिली खुली ऑफर ; विधानसभेला शिवसेना किंगमेकर ठरेल

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख वीरू फाळके, तालुकाप्रमुख राज लोखंडे, शहर प्रमुख नितीन कांबळे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख लखन ठोंबरे, अमीर मुलानी, निलेश कांबळे, राम भोरे, रोहित कांबळे, मयूर कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जो विद्यमान आमदार असतो त्या पक्षास विधानसभेची ती जागा सुटते

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले, विधानसभा मतदारसंघाचा जो विद्यमान आमदार असतो त्या पक्षास विधानसभेची ती जागा सुटते हे साध आणि सोपे गणित आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाला जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे जे आज पडळकर बंधू आणि वैभवदादा आज मेळावे घेऊन निवडणूक लढविण्याची घोषणा करत आहेत. पण इथं शिंदे गटच लढेल यात कोणतीही शंका नाही. खानापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार आपल्या विचारधारेचा व्हावं म्हणून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढविणार आहे.

विधानसभेला सहानभूतीची लाट मिळवायचा वैभवदादांचा प्रयत्न असेल पण असं काही होणार नाही.

आमच्या पक्षाचा आमदार व्हावा माझ्या पक्षाला एक जागा या सांगली जिल्ह्यात वाढावी या उद्देशाने मी पक्षाच्या विचारधारेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे जाहीर खुली ऑफर देतो की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या कदाचित वैभवदादांना वाटत असेल की, लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी वातावरण तयार करून सहानभूतीची लाट मिळवली. त्यामुळे कदाचित विधानसभेला सहानभूतीची लाट मिळवायचा वैभवदादांचा प्रयत्न असेल पण असं काही होणार नाही. कारण खानापूर मतदारसंघ शिंदे गटाला सुटणार आहे. त्यामुळे वैभवदादा सहानुभूतीच्या पाठीमागे लागू नका.

विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या मुद्यावर लढविल्या जातात.

ते पुढे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या मुद्यावर लढविल्या जातात. आमची ताकद किती आहे, हे आम्हाला माहीत आहे. आमची निवडून येण्याची लायकी नसली तर शंभर टक्के तुम्हाला तुमची जागा दाखवण्याची लायकी शंभर टक्के आमची आहे. सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही तयारी करतोय.
खर्‍या अर्थाने आपला राजकीय शत्रू भाजपला हरविण्यासाठी आपण महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी एकसंघपणे लढणे गरजेचे आहे.

शिवसेनेकडे सक्षम उमेदवार असून विधानसभा निवडणूक लढायची तयारी करतोय त्या जागा आम्हाला सोडाव्यात.

महाराष्ट्राच्या विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता आणायची असेल तर एक एक आमदार महत्त्वाचा आहे आणि म्हणून जे महाविकास आघाडीचे पाच आमदार आहेत ते सोडून उरलेल्या सांगली, मिरज आणि खानापूर या तीन जागा आहेत. सांगली, मिरज आणि खानापूर याठिकाणी शिवसेना तयारी करतेय. शिवसेना त्या ठिकाणी ताकतीने लढण्यासाठी शिवसेनेकडे सक्षम उमेदवार असून विधानसभा निवडणूक लढायची तयारी करतोय त्या जागा आम्हाला सोडाव्यात. अन्यथा शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये त्या ठिकाणी तयारी करू. विधानसभा निवडणूकीवेळी शिवसेना किंगमेकर ठरणार आहे. येणार्‍या तीन महिन्यांमध्ये आम्ही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक पक्षबांधणी करणार आहे.

आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये आमची ताकत आहे.

ते पुढे म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करतोय. आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये आमची ताकत आहे. कदाचित एखादा उमेदवार विजयी होण्याइतपत आमची ताकद नसेल, मात्र कोणाला विजयी करणे इतपत किंवा त्याची जागा दाखवण्यात पण दखलपात्र ताकद शिवसेनेकडे नक्कीच आहे. याचा महाविकास आघाडीने गांभीर्याने विचार करावा.

वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टी हाच आमचा राजकीय शत्रू आहे. त्यांनीही यापूर्वी आमच्याबरोबर युतीत असताना एकत्रित निवडणुका लढून आमच्या जागा पाडण्याचा नेहमीच प्रयत्न केला. यावेळी भाजप सारख्या राजकीय शत्रूबरोबर लढताना महाविकास आघाडी म्हणून एकसंघपणे लढणे गरजेचे आहे.

पुन्हा आत – बाहेर केल्यास त्याचे परिणाम महाराष्ट्रभर

सांगली जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी महाविकास आघाडीकडे असणारे पाच मतदारसंघ वगळता खानापूर, मिरज आणि सांगली या तीन विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा आहे. या तीनही ठिकाणच्या उमेदवार्‍या करण्याइतपत सक्षम उमेदवार आमच्या पक्षाकडे आहेत. या तीनही ठिकाणी आम्हाला चांगली मते मिळाली आहेत आणि या तीनही जागा निवडून येण्याचा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीमध्ये या तीनही जागा आम्हाला सोडाव्या. लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी विधानसभेला पुन्हा आत – बाहेर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्रभर सहन करावे लागतील, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी यावेळी दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज