rajkiyalive

TASGAON : फुटपाथवर झोपणारा राहुल झाला क्रीडाअधिकारी

 

जनप्रवास, तासगाव:

TASGAON : फुटपाथवर झोपणारा राहुल झाला क्रीडाअधिकारी : जिदद, चिकाटी अंगीकारून ध्येय डोळयासमोर ठेऊन पाऊले टाकल्यास यश निश्चित मिळते. अगदी असेच चित्र तासगांवात पाहवयास मिळाले. परिस्थितीवर मात करीत, खडतर प्रवास करीत, प्रसंगी फुटपाथवर झोपून शिक्षण घेणार्‍या तासगांवातील राहुल रामचंद्र गायकवाड या तरूणाने क्रीडा अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. राहुलनी राज्यात ओबीसी मधून पहिला व सर्वसाधारणमधून पाचवा क्रमांक मिळवला आहे. आपण आपले ध्येय पूर्ण केले असल्याचे मत राहुलनी व्यक्त केले आहे.

TASGAON : फुटपाथवर झोपणारा राहुल झाला क्रीडाअधिकारी

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या क्रीडा अधिकारी परिक्षेत ओबीसी गटातून राज्यात प्रथम येण्याचा, तसेच सर्वसाधारण गटातून राज्यात पाचवा येण्याचा बहुमान तासगावातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राहुल रामचंद्र गायकवाड यांनी मिळवला आहे.

तासगांवातील सुर्यवंशी गल्ली येथील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले राहुल.

गरीब परिस्थिती पण शिकण्याची जिदद त्यांची होती. येथील संस्कार मंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण कुंडल येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह येथे घेतले. तर महाविदयालयीन शिक्षण पुणे येथे घेतले. हे शिक्षण घेत असताना दिवसभर काम करून रात्रीचे शिक्षण घेतले. परिस्थितीवर मात करीत ही शैक्षणिक वाटचाल सुरू असतानाच 2013 मध्ये वडिलांचे छत्र हरपले. आणि कौटुंबिक जबाबदारी ही त्यांच्यावर पडली.

तलवार बाजीसह मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन नेत्रदिपक यश त्याने मिळवले आहे.

गेल्या 15 वर्षापासून क्रीडा क्षेत्रात काम करीत त्यांने राज्यासह देशपातळीवर क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रमुख म्हणून काम केले आहे. तलवार बाजीसह मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन नेत्रदिपक यश त्याने मिळवले आहे. क्रीडा क्षेत्रात पारंगत असलेल्या राहुलची अकोला जिल्हयातून तलवारबाजी या खेळाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

राज्यात ओबीसी मधून प्रथम व सर्वसाधारणमधून पाचवा येण्याचा बहुमान मिळवला आहे.

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत घेण्यात दि.21 ऑक्टोंबर रोजी क्रीडा अधिकारी पदाच्या परिक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहिर झाला आहे. या परिक्षेत राहुलनी बाजी मारली. त्यांनी राज्यात ओबीसी मधून प्रथम व सर्वसाधारणमधून पाचवा येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल तासगांव परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

..परिस्थितीवर मात करीत ध्येय पूर्ण केले: राहुल गायकवाड.

क्रीडा अधिकारी व्हायचेच या जिददीने परिस्थितीवर मात करीत, खडतर प्रवास करीत मी सतत प्रयत्नशिल होतो. यास अखेर यश येऊन माझे ध्येय पूर्ण झाले असे स्पष्ट करून पुणे येथे आपण फुटपाथवर झोपून शिक्षण घेतले, तसेच अंडा बुर्जी गाड्यासह पडतील ती कामे न लाजता केली. तर हे सर्व करीत असताना आजही शेतात काम करणारी आई सरस्वती रामचंद्र गायकवाड हीचा आधार व साथ मोलाची ठरली असे मत राहुल गायकवाड यांनी व्यक्त केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज