rajkiyalive

दानोळीच्या तरूणाचे विमानाने ह्रदय मुंबईत; अन्य अवयव ग्रीन कॉरिडॉरने पुण्यात

 

सांगली :

दानोळीच्या तरूणाचे विमानाने ह्रदय मुंबईत; अन्य अवयव ग्रीन कॉरिडॉरने पुण्यात : कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळीच्या सदन कुटुंबातील 32 वर्षीय तरूण. नितीश कुमार पाटील असं त्याचं नाव. आई-वडिल शेती करतात. तर मोठा भाऊ नोकरी करतो. नितीश वयाच्या 12 वर्षापासूनच फिटच्या आजाराने त्रस्त होता. घरातल्यांनी अगदी तळहातावरच्या फोडा प्रमाणे त्याला संभाळला होता. मात्र, आठवड्यापुर्वी काळाने त्याच्यावर घाला घातला. कुटुंबियांनी शक्य तेवढे प्रयत्न केले, अखेर त्याने साथ दिली नाही. त्याच्या मेंदूचे कार्य थांबले (ब्रेन डेड). आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला… त्याच्या आवयवातून आठवणी तेवत ठेवण्यासाठी कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

दानोळीच्या तरूणाचे विमानाने ह्रदय मुंबईत; अन्य अवयव ग्रीन कॉरिडॉरने पुण्यात

या निर्णयाने हृदय, यकृत, दोन किडनी, दोन डोळे, त्वचा दान देत आठ ते नऊ जणांना जीवदान मिळाले. नितीश आज नसला तरी त्याच्या ह्रदयाची धडधड आजही सुरू आहे. या कार्यात पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर करत वाहतूकीचा मार्ग मोकळा केला. कुटुंबियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी हात जोडत निरोप दिला. मात्र, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ हे समर्थ रामदासांचे बोधवाचन यावेळी अनेकांच्या तोंडावर दिसून आले.

उषःकाल हॉस्पिटलच्या माध्यमातून आठवड्यात दुसर्‍यांदा आणि वर्षात तिसर्‍यांदा फत्ते झाली.

रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद पारेख, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद मालाणी यांनी तातडीने सारी प्रक्रिया पुर्ण केली. कुटुंबियांचे डॉ. मालाणी यांनी समुपदेशन केले. त्यानुसार आजचा दिवस ठरला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनाही माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्याचे नियोजन झाले. मुंबईतील एका रुग्णास ह्रदयाची गरज होती.

मुंबईला जाण्यासाठी एअर म्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली.

सकाळी दहाच्या सुमारास रुग्णवाहिका सज्ज केली. पोलिसांनी सायरन देत रस्ते मोकळे केले. त्यासाठी दहा पोलिस नियुक्त करण्यात आले होते. 34 मिनिटात 50 किलोमीटरचे अंतर कापत रुग्णवाहिका विमानतळावर पोहचली. साडेबाराच्या सुमारास मुंबईतील रुग्णालयात ह्रदय पोहचले आणि शस्त्रक्रिया सुरू झाली. यकृत, दोन किडन्या हे पुण्याला नेण्यात येणार होते. त्यासाठी साडेदहा वाजता पुन्हा रुग्णवाहिका सज्ज झाली. जलद गतीने यंत्रणाला कामी लागली.

कर्नाळ-नांद्रे मार्गे पाचवा मैल, पलूस मार्गे कराडला ताफा निघाला.

46 मिनिटांत सांगली जिल्ह्याची हद्द सोडण्यात आली. उषःकाल हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर सव्वा तीन तासात पुण्यात रुग्णवाहिका पोहचली आणि प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू झाली. तसेच सांगलीतील दोन रुग्णांना नेत्रदान करण्यात आले. त्वचादान करण्यात आले. आठवड्यातील दुसरी कामगिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पारेख, डॉ. आनंद मालाणी, डॉ. संजय कोगेकर, डॉ. दिगंबर माळी यांच्या टीमने फत्ते केली.

दुसर्‍यांदा अवयवदान…

नितीन पाटील यांच्या काकू ललिता सातगोंडा पाटील यांनीही अवयव दान केले होते. त्यावेळी सांगलीकरांनी पहिल्यांदा ‘ग्रीन कॉरिडॉर’चा थरार अनुभवला होता. या आठवड्यात दुसर्‍या हे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. आवयवन दानासाठी प्रबोधन होत असल्याने अनेकजण आता पुढाकार घेतात, ही सामाधानाची बाब यानिमित्ताने समोर येत आहे. छातीवर दगड ठेवून त्याा अवयव दानाचा निर्णय नितीनच्या आईने घेतला.

त्याला वडिल आणि मुलानेही साथ दिली. या निर्णयातून तो आपल्या कायमस्वरूपी राहणार आहे, अशी भावान हुंदके देत त्यांनी व्यक्त केली. हात जोडून मुलाला निरोप देताना त्या माऊलीचे डोळे पाणावले आणि हुंदके देवू लागली. हा भावनिक क्षणाने रुग्णालयातील सारेच स्तब्ध झाले होते. मात्र, त्या मातेच्या पुढाकाराला सार्‍यांनीच सलाम केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज