rajkiyalive

ICHALKARANJI (ICHALKARANJI MURDAR NEWS) इचलकरंजीत पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

ICHALKARANJI (ICHALKARANJI MURDAR NEWS) इचलकरंजीत पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

 

इचलकरंजी
ICHALKARANJI (ICHALKARANJI MURDAR NEWS) इचलकरंजीत पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून : पतीने अमानुषपणे बेदम मारहाण करून गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. करिश्मा किसन गोसावी (वय 25, रा. संग्राम चौक ) असे मृत महिलेचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर पती किसन गोसावी हा फरार झाला पण पोलीसांनी ठाणे जिल्ह्यातील एका गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

ICHALKARANJI (ICHALKARANJI MURDAR NEWS) इचलकरंजीत पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

ICHALKARANJI (ICHALKARANJI MURDAR NEWS) इचलकरंजीत पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून : याबाबत अधिक माहिती अशी की संशयित किसन गोसावी हा मूळचा म्हैशाळ (ता. मिरज) येथील असून, इचलकरंजी ही सासुरवाडी आहे दोनच महिन्यांपूर्वी त्याने संग्राम चौक येथे घेतलेल्या भाड्याच्या घरात तत्नी व मुलासह राहण्यास आला होता. तर मयत करिश्मा हिचेचे माहेर शेजारीच आहे.

घरात तिचा मृतदेह आढळून आला.

ICHALKARANJI (ICHALKARANJI MURDAR NEWS) इचलकरंजीत पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून : करिश्मा ही रात्री नेहमीच्या वेळेत घरी न आल्याने माहेरचे त्यांच्या घराकडे जावून चौकशी करु लागले. तेव्हा घराला कुलूप लावल्याचे दिसून आले. मात्र, दिवसभर करिश्मा आढळून न आल्याने इतर नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडले. तेव्हा घरात तिचा मृतदेह आढळून आला. ही खुनाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू ताशिलदार हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

तसेच करिश्मा माहेरच्या नातेवाईकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्याने हे कृत्य केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून रात्री उशिरा आय जी एम रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.

मृतदेह चादर व जीन्स पॅन्टने झाकलेल्या अवस्थेत होता.

यांची दोन्ही मुले सकाळी दोन वेळा घराकडे आली होती. मात्र, किसन याने त्यांना घरात येवू दिले नाही. हे भागातील नागरिकांच्या निदर्शनास आले. सकाळपासूनच तो घरातूनच वारंवार डोकावून बाहेर पाहात होता. मात्र, नागरिकांची चाहूल लागताच पुन्हा घर बंद करीत असे

नातेवाईकांनी सीसीटीव्ही पाहिला असता पहाटे त्याने स्क्रॅप गोळा करण्यासाठीचा ढकलगाडा दारात आणल्याचे तसेच त्यावर काही बॉक्स ठेवल्याचे दिसून आले. मृतदेह कपड्यात झाकलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, भागातील नागरिकांची वर्दळ असल्याने त्याने घराला कुलूप लावून दुपारनंतर पळ काढला, असावा असा कयास पोलीसांनी व्यक्त केला.

तात्काळ रात्रीपासूनच पोलीस किसन गोसावीच्या तपासासाठी निरनिराळ्या ठिकाणी रवाना झाले.अखेर ठाणे जिल्ह्यातील एका गावातून जेरबंद करुन त्याच्या मुसक्या आवळल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज