rajkiyalive

SANGLI BANK NEWS : जिल्हा बँक मोर्चेकरांना एस.टी बँक करायची आहे का? : आ. मानसिंगराव नाईक 

जनप्रवास । प्रतिनिधी

SANGLI BANK NEWS : जिल्हा बँक मोर्चेकरांना एस.टी बँक करायची आहे का? : आ. मानसिंगराव नाईक  : सांगली ः आ. गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बँकेवर काढलेला मोर्चा केवळ राजकीय हेतूने काढला आहे. बँकेच्या कारभारावर सभासद, शेतकरी, ठेवीदार, कर्मचारी समाधानी आहेत. जिल्हा बँकेची मोर्चेकरांना एस. टी. कर्मचारी बँक करायची आहे का, असा प्रश्न जिल्हा बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

SANGLI BANK NEWS : जिल्हा बँक मोर्चेकरांना एस.टी बँक करायची आहे का? : आ. मानसिंगराव नाईक 

जिल्हा बँकेवरील काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमिवर आमदार नाईक बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ पाटील यांनी एस टी कामगारांचे आंदोलन केले. त्यांचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचारी बँकेवर पॅनेल उभा करुन निवडून आले. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे एसटी बँकेतील 70 टक्के ठेवी कमी झाल्या. बँक अडचणीत आली. कर्मचार्‍यांचे पगारही करणे शक्य होईना.

त्यामुळे त्यांच्या बाजुने निवडून आलेले 15 संचालकांनी गट बदलून एस.टी. कामगार इंटकच्या गटात सहभागी झाले,

असा त्यांच्या बँक कारभाराचा अनुभव आहे. आता त्यांनी जिल्हा बँकेची एसटी कर्मचारी बँक करण्याचा विचार आहे काय, हे पहावे लागेल. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालकांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत प्रगतीची आकडेवारी सर्वांसमोर आहे. विश्वासार्हता, पारदर्शी कारभारामुळेच या कालावधीत एक हजार कोटींनी ठेवी वाढल्यात.

शंभर रुपयांची ठेव ठेवतानाही एनपीएसह सर्वच बाबतीत प्रगती झालेली आहे.

बँकेची प्रगती त्यांना पहावत नाही. म्हणूनच ते बँकेचे नेते, अध्यक्ष, संचालक यांची बदनामी करीत आहेत. ज्यांच्या कारभारावर ते बोलत आहेत. त्यांतील काही प्रकरणांची चौकशी सुरु आहे. त्याबाबत मीच तक्रार केलेली होती. ज्यांच्याकडे लोकमत नाही, त्यांना आता बँकेत प्रवेश करायचा आहे. त्यासाठी त्यांनी बँकेवर प्रशासक नेमून मागच्या दारांने प्रशासकीय मंडळावर यावयाचे आहे. हा मोर्चा पूर्ण राजकीय हेतुने काढण्यात आल्याचे स्पष्ट होते.

Open a Forex Trending account for free and enjoy trading

 

शेतकरी मुलगी लग्नासाठी 50 हजार देणार

शेतकर्‍यांच्या मुलीच्या लग्नासाठी तातडीने 50 हजार अल्प व्याजात देण्याचे धोरण जिल्हा बँकेने घेतलेले आहे. त्यांची तातडीने अंमलबजावणी करीत आहे. त्यासाठीची तरतुद बँकेच्या नफ्यातून केली जात आहे. जिल्ह्यातील 80 टक्के शेतकर्‍यांना आम्ही पीक कर्जेही तोटा सहन करुन देत असल्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज