rajkiyalive

नांदणीत 14 जुलैपासून आचार्य विशुद्धसागर मुनी महाराजांसह 26 त्यागींची पावन चातुर्मास सोहळा

जनप्रवास । प्रतिनिधी
नांदणीत 14 जुलैपासून आचार्य विशुद्धसागर मुनी महाराजांसह 26 त्यागींची पावन चातुर्मास सोहळा : सांगली ः दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील 743 गावांचे अधिपत्य असलेल्या नांदणी (जि. कोल्हापूर ) येथे प.पू. चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री. विशुद्धसागर मुनी महाराज यांचा 26 त्यागींसह 35 वा पावन वर्षायोग (चातुर्मास) 14 जुलैपासून सुरु होणार असल्याची चातुर्मास समिती महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब पाटील आणि कर्नाटकचे चातुर्मास समितीचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब नाडगोंडा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

नांदणीत 14 जुलैपासून आचार्य विशुद्धसागर मुनी महाराजांसह 26 त्यागींची पावन चातुर्मास सोहळा

पाटील पुढे म्हणाले की, प.पू.आचार्यश्री विशुध्दसागरजी मुनिश्रींच्या या विशाल संघाचा या भागातील हा प्रथमच चातुर्मास (वर्षायोग) होत आहे. रविवार (दि. 14) रोजी सकाळी 7.25 वाजता नांदणी नगरीमध्ये भव्य मंगल प्रवेश होणार आहे. तर शनिवार (दि.20) रोजी दु. 1 वाजता नांदणीत भव्य चातुर्मास कलश स्थापन्याचा कार्यक्रम होईल. यासाठी द्वादशांग कलश, सोलहकारण कलश आणि महाऋध्दि कलशांची उद्घोषणा करण्यात आली असून या कलशांचे वितरण चातुर्मास कमिटीतर्फे करण्यात येत आहे.

प.पू.जगत्गुरु स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजींच्या मंगल अधिनेतृत्वाखाली हा चातुर्मास भव्य दिव्य प्रमाणात संपन्न करण्याचा मानस आहे. आचार्यश्रींच्या प्रभावी वाणीने या भागातील श्रावक-श्राविकांना एक आध्यात्मिक पर्वणी लाभणार आहे. यासाठी जिनसेन संस्थान मठ, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ आणि सकल जैन समाज, नांदणीच्यावतीने चातुर्मासाचे नियोजन सुरू आहे
मंगल प्रवेश व आध्यात्मिक सोहळ्यास सांगली, कोल्हापूर व कर्नाटकातील श्रावक, श्राविका हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा व मुनिश्रींच्या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले.

यावेळी डॉ.अजित पाटील, नांदणी मठाचे ट्रस्टी प्रा. आप्पा भगाटे, ज्येष्ठ जैन साहित्यिक डॉ. चंद्रकांत चौगुले, वीर सेवा दलाचे सचिव अजित भंडे आदी उपस्थित होते.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज