प्रताप मेटकरी / जनप्रवास विटा
काॅंग्रेसच्या बैठकीत ठरलं खानापूरचा आमदार ‘काॅंग्रेसचा’च : “आधे इधर आधे उधर” अशी बिकट अवस्था असलेल्या खानापूर तालुक्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांची विट्यातील काँग्रेस कमिटीत एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत खानापूरचा आमदार ‘काॅंग्रेसचा’च असा नारा देत आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढविण्याचा आणि उमेदवार म्हणून युवा नेते डॉ. जितेश कदम यांचे नाव खानापूर विधानसभेसाठी प्रदेश कमिटीकडे पाठविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
काॅंग्रेसच्या बैठकीत ठरलं खानापूरचा आमदार ‘काॅंग्रेसचा’च
युवा नेते डॉ. जितेश कदम यांचे नाव विधानसभेसाठी प्रदेश कमिटीकडे पाठविण्याचा एकमुखी निर्णय
त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीत सुरू असणाऱ्या वादात आता काँग्रेसने उडी घेत कदम घराण्यातील डॉ. जितेश कदम यांच्या नावाचा राजकीय राजकीय बॉम्ब टाकून संवेदनशील विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या खानापूर मतदारसंघात धमाका उडवून दिला आहे.
खानापूर तालुक्यातील काँग्रेसने गत विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांना थेट काँग्रेस कमिटीत जाहीर पाठिंबा देत खानापूर तालुक्यातील काँग्रेस आमदार बाबर यांच्या दावणीला बांधली असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत होती. त्यामुळे खानापूर तालुक्यातील काँग्रेसची “आधे इधर आधे उधर” अशी बिकट अवस्था आहे. खानापूर मतदारसंघात निर्णायक व्होट बँक कदम गटाची आहे. मात्र काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम हे म्हणावे असे लक्ष या मतदारसंघात देत नाहीत. कदम आणि बाबर गटाची छुपी युती असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेसाठी काँग्रेसकडून युवा नेते डॉ. जितेश कदम यांचे नाव चर्चेत होते.
मात्र याबाबत कोणतीच राजकीय पटलावर हालचाल दिसत नव्हती. दरम्यान कदम गटाचे खंदे समर्थक माजी नगरसेवक अँड. सुमित गायकवाड यांनी “खानापूर विधानसभेची जागा काँग्रेस लढविणारच” अशी सूचक पोस्ट फेसबुकवर टाकून भूमिका व्यक्त केली होती त्यामुळे खानापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते कोणती भूमिका घेणार ? याचीच उत्सुकता होती. त्यामुळे आज ही उत्सुकता संपुष्टात आली. आज विट्यातील काँग्रेस कमिटीत काँग्रेसचे
विटा शहराध्यक्ष सुरेश पाटील, अशोक साळुंखे, युवा नेते शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी संचालक ॲड.विठ्ठलराव साळुंखे, माजी नगरसेवक अँड. सुमित गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत चव्हाण, संचालक मोहन पाटील, भानुदास पाटील, मचिंद्र महापुरे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसतर्फे ताकदीने लढविण्याचा आणि उमेदवार म्हणून युवा नेते डॉ. जितेश कदम यांचे नाव खानापूर विधानसभेसाठी प्रदेश कमिटीकडे पाठविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
युवा नेते शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी संचालक ॲड.विठ्ठलराव साळुंखे म्हणाले, खानापूर विधानसभेची जागा ही परंपरेने काँग्रेसची आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा काँग्रेस ताकदीने लढणार आहे. खानापूर मतदारसंघाच्या निर्मितीपासून मतदारसंघातील जनतेने काँग्रेस पक्षास साथ दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद सिद्ध केली आहे. त्यामुळे विधानसभेला हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे.
युवा नेते डॉ. जितेश कदम यांच्या रूपाने काँग्रेसकडून तरुण तडफदार उमेदवार दिला जाणार आहे.
काहीही झाले तरी काँग्रेस यंदाची विधानसभा निवडणुकीवेळी ही जागा पूर्ण ताकदीने लढविणार आहे. उमेदवार म्हणून युवा नेते डॉ. जितेश कदम यांचे नाव खानापूर विधानसभेसाठी प्रदेश कमिटीकडे पाठविण्याचा एकमुखी निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.