जनप्रवास : प्रथमेश गोंधळे.
सांगली विभागात दोन महिन्यात एसटी सुसाट : 9 कोटींचे मिळाले उत्पन्न. : सांगली : जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था तशी वाईटच पण उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या एसटीने मात्र सुसाट कामगिरी केली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये एसटीने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यातून एसटीच्या उत्पन्नामध्ये घसघशीत वाढ झाली असून, या फायद्यामध्ये सांगली जिल्ह्याने 8 कोटी 71 लाख 32 हजार 163 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये तब्बल 14 लाख 29 हजार 848 प्रवाशांनी प्रवास केला आहे. एसटी महामंडळात सुद्धा ऑनलाईन झटक्यानंनतर 1 कोटी 39 लाख 99 हजार 335 रुपयांची तिकिटे पीआय पेमेंट द्वारे काढली आहेत.
सांगली विभागात दोन महिन्यात एसटी सुसाट : 9 कोटींचे मिळाले उत्पन्न.
शाळा, कॉलेज यांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्या असल्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये प्रवासाचे नियोजन होत असते. याच काळामध्ये लग्नांचाही हंगाम असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी हा सुगीचा काळ असतो. त्यामुळेच, एसटीनेही मे आणि जूनच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवासाविषयी नियोजन आखले होते. त्यात सांगली जिल्ह्यामध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यामध्ये एसटीला यश मिळाले आहे. त्यामुळे, एकट्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एसटी च्या सांगली विभागाने सुमारे 8 कोटी 71 लाखांचे निव्वळ उत्पन्न प्राप्त केले आहे. यातही जिल्ह्यातील दहा आगारांपैकी सांगली, इस्लामपूर आणि तासगाव आगाराची कामगिरी जिल्ह्यात सरस राहिली आहे.
सांगली विभागाच्या अधिकार्यांनी मे महिन्यासाठी नियोजन केले होते. त्यामध्ये विभागाला सुमारे 8 कोटी 71 लाख 32 हजार 163 रुपयांचा उत्पन्नाचा पल्लागाठता आला. यासाठी जिल्ह्यातील 600 हुन अधिक बसनी एकूण 27 लाख 82 हजार किलोमीटरचा प्रवास केला. यातून बसला 31.31 रुपये प्रतिकिलोमीटरला उत्पन्न मिळाले. जिल्ह्यात दहा आगार आहेत. यामध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी सांगली आगाराने केली आहे. आगाराच्या मोडक्या जरी बसेस असल्या तरी त्या बसनी 3 लाख 47 हजार 783 किलोमीटरचा प्रवास करून 2 कोटी 35 लाख 18 हजारांची कमाई केली आहे. सांगली विभागातील सर्व अधिकारी, चालक, वाहक, यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वयामुळे व परिश्रमामुळे एसटी च्या उत्पन्न वाढीत विभाग चांगली कामगिरी करू शकला, अशी प्रतिक्रिया यावेळी महामंडळाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली.
यूपीआय पेमेंटला नागरिकांची मोठी पसंती…
एसटी प्रवासादरम्यान अनेकदा तिकिटाच्या सुटया पैशांवरून कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात खटके उडतात. कॅशलेसच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत जानेवारीपासून प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी यूपीआय पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी सर्व वाहकांसाठी अॅण्ड्रॉईड तिकीट इश्यू मशीन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येते. या प्रणालीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. सुट्ट्यांच्या हंगामात दि. 15 एप्रिल ते दि. 15 जून या एक महिन्याच्या कालावधीत 1 कोटी 39 लाख 99 हजार 335 रुपयांचे ऑनलाइन पेमेंट झाले आहे.
बंद केलेल्या मार्गांवर नवीन बसेस सुरू करण्याची मागणी…
एसटी महामंडळाच्या सांगली आणि मिरज या आगारकडे असणार्या बर्याच बसेस या नादुरुस्त असतात. अनेक बसेसची अवस्था ही वाईट झाली आहे. त्यात शिवशाही या कधी बंद पडतील याचा नेम नाही. त्याचबरोबर सुट्ट्यांमध्ये ज्यादा मार्गावरील बंद केलेल्या बसेस पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. तसेच नव्या बसेस मिळण्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न देखील करणे गरजेचे आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सांगली आगाराने केलेली कामगिरी…
आगार एकूण किलोमीटर वाहतूक उत्पन्न प्रति किलोमीटर उत्पन्न एकूण प्रवाशी
सांगली 3 लाख 47 हजार 783 1 कोटी 35 लाख 18 हजार 297 38. 87 2 लाख 31 हजार 610
मिरज 2 लाख 90 हजार 266 80 लाख 38 हजार 608 27.68 1 लाख 16 हजार
इस्लामपूर 3 लाख 43 हजार 463 1 कोटी 3 लाख 44 हजार 105 30.12 1 लाख 91 हजार
तासगाव 3 लाख 77 हजार 118 1 कोटी 19 लाख 38 हजार 188 31.66 1 लाख 91 हजार 89
विटा 2 लाख 81 हजार 448 88 लाख 21 हजार 124 31.34 84 हजार 155
जत 2 लाख 49 हजार 359 66 लाख 66 हजार 805 48 1 लाख 1 हजार 454
आटपाडी 1 लाख 91 हजार 169 58 लाख 63 हजार 469 30.67 1 लाख 9 हजार 731
कवठेमहांकाळ 1 लाख 90 हजार 462 52 लाख 59 हजार 462 27.61 1 लाख 20 हजार 980
शिराळा 2 लाख 98 हजार 148 94 लाख 63 हजार 321 31.65 1 लाख 76 हजार 359
पलूस 2 लाख 13 हजार 297 72 लाख 49 हजार 784 33.99 1 लाख 7 हजार 371
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.