rajkiyalive

JAT VIDHANSABHA : जतला गोपीचंद पडळकरांची दावेदारी; स्थानिकांची कोंडी

JAT VIDHANSABHA : जतला गोपीचंद पडळकरांची दावेदारी; स्थानिकांची कोंडी

जनप्रवास : सांगली
JAT VIDHANSABHA : जतला गोपीचंद पडळकरांची दावेदारी; स्थानिकांची कोंडी : जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी दावेदारी सांगत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिक इच्छुक तम्मनगौडा रवी-पाटील, नेते डॉ. रविंद्र आरळी यांच्यासह अनेकांची कोंडी झाली आहे. यासाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उपरी उमेदवारी नको असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासमोर आव्हान उभे करताना उमेदवारीची कोंडी झाल्याचे दिसून येते.

JAT VIDHANSABHA : जतला गोपीचंद पडळकरांची दावेदारी; स्थानिकांची कोंडी

जत विधानसभा मतदारसंघात तसे पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तुलनेत तुल्यबळ अशी भाजपची चांगली मोर्चेबांधणी असल्याचे दिसून येते. येथून यापूर्वी माजी आमदार मधुकर कांबळे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, माजी आमदार विलासराव जगताप यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाडाव केला होता. परंतु गेल्या पंचवार्षिक टर्ममध्ये विलासराव जगताप यांचा विक्रमसिंह सावंत यांनी पराभव केला.

अर्थात या पराभवासह अन्य कारणांवरून तत्कालिन खासदार संजयकाका पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यातच भाजपमध्ये तालुक्यात गटबाजी उफाळून आली होती. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा देऊन उघड उघड संजयकाका यांना विरोध केला. त्यांनी थेट अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुराही सांभाळली.

दरम्यान आमदार विक्रमसिंह सावंत व जगताप यांनी एकदिलाने विशाल पाटील यांची बाजू सांभाळूनही असतानाही संजयकाका पाटील यांनी दुष्काळी भागास दिलेल्या म्हैसाळ योजेनेच्या पाण्यासह गटबांधणीने सहा हजाराचे मताधिक्य मिळविले. त्यात गोपीचंद पडळकर यांनीही लक्ष घालून भाजपचा किल्ला लढविला होता.वास्तविक संजयकाकांचा पराभव झाला आणि सर्वत्र पिछाडी असली तरी जत विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपला लिड मिळाल्याने विधानसभा निवडणुकीला अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

अर्थात प्रबळ दावेदार माजी आमदार विलासराव जगताप तसे म्हटले तर बाहेरच असल्याने मार्ग मोकळा होईल अशा अपेक्षा जि. प. माजी सभापती तम्मनगौडा रवी-पाटील, डॉ. रविंद्र आरळी, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आदींनी दावेदारी सांगितली आहे. त्यादृष्टीने आपापल्यापरीने मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.

 काँग्रेसचे सावंत यांचा पराभव करण्यासाठी ताकदीचा उमेदवार पाहिजे अशी भाजपनेत्यांची मानसिकता आहे.

सोबतच खानापूर-आटपाडी मतदारसंघ महायुतीतील शिवसेना शिंंदे गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना हक्काचा मतदारसंघ नाही. परिणामी पडळकर यांनी जतमधून लढण्याची तयारी सुरू केली आहे. नेत्यांनीही त्यांना ग्रीनसिग्नल दिल्याची चर्चा आहे.

अर्थात सावंत यांना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरचा उमेदवारच द्यावा अशी भूमिका रवि-पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यासाठी फडनवीस, बावनकुळे यांच्यासह नेत्यांकडे आग्रह सुरू केला असून, खुलेआम पडळकरांना विरोधाची भूमिका घेतली आहे. पण पडळकर यांच्या तुलनेत त्यांची ताकद कमकुवत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला भाजपमध्ये स्थानिक-उपरा उमेदवाराच्या वादात उमेदवारीची कोंडी होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज