rajkiyalive

SANGLI BANK NEWS : जिल्ह्यातील एक हजार शेतकर्‍यांना 4.39 कोटीची व्याजमाफी

जनप्रवास । सांगली

SANGLI BANK NEWS : जिल्ह्यातील एक हजार शेतकर्‍यांना 4.39 कोटीची व्याजमाफी : जिल्हा बॅँकेने शेतकर्‍यांकडील थकित कर्जाच्या वसुलीसाठी सुरु केलेल्या वसुली प्रोत्साहन निधी योजनेमध्ये (ओटीएस) जिल्ह्यातील 965 शेतकर्‍यांनी लाभ घेतला. या शेतकर्‍यांनी योजना सहभाग घेत एकरकमी कर्ज परतफेड केल्याने त्यांना 4 कोटी 39 लाख रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे. या शेतकर्‍यांकडून 14 कोटी 82 लाख रुपयांची थकबाकी वसुल झाली आहे.

SANGLI BANK NEWS : जिल्ह्यातील एक हजार शेतकर्‍यांना 4.39 कोटीची व्याजमाफी

जिल्हा बँकेच्या ओटीएस योजनेतून 15 कोटीची वसुली

जिल्हा बॅँकेच्या वतीने शेतकर्‍यांना शेती व बिगर शेती कारणांसा विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. मात्र दुष्काळी परिस्थीती, अतिवृष्टी आदि नैसर्गीक आपत्ती, शेती मालाला भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे कर्ज थकीत जाते परिणामी त्यांना नवीन कर्ज पुरवठा होत नाही. शिवाय कर्ज थकीत गेल्याने सवलतीच्या व्याज दराच्या कर्जाला नियमीत दराने व्याज आकारणी होते. त्यामुळे शेतकर्‍यांवर मोठ्या प्रमाणात व्याजाचा भुर्दंड पडतो. या दुष्ट चक्रातून शेतकर्‍यांना सावरण्यासाठी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी शेतकर्‍यांसाठी वसुली प्रोत्साहन निधी योजना (ओटीएस) आणली.

थकबाकीदार शेतकर्‍यांने एक रकमी कर्ज पतरफेड केल्यास थकीत व्याजावर सहा टक्के दराने आकारणी

या योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांने एक रकमी कर्ज पतरफेड केल्यास थकीत व्याजावर सहा टक्के दराने आकारणी करण्यात येते. उर्वरीत साडे चार टक्के व्याज जिल्हा बॅँक स्वत:च्या नफ्यातून संबधीत विकास सोसायटीला देते. यामुळे शेतकर्‍यांवरील व्याजाचा भुर्दंड कमी होत असून त्यांना मोठा दिलासा मिळत आहे. शिवाय साडे चार टक्के व्याजाची रक्कम जिल्हा बॅँक सोसायटींना देत असल्याने सोसायट्यां व्यस्त तफावतीच्या संकटातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे ही योजना शेतकरी व सोसायटी यांना दोघांनाही फायद्याची होती.

मागील वर्षी 1 जुले 2023 ते चालू वर्षी 30 जून 2024 पर्यंत या योजनेत जिल्ह्यातील 254 सोसायटीमधील 965 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. त्यांना 17 कोटी 77 लाख 49 हजार 490 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. यातील 14 कोटी 82 लाख 61 हजार 373 रुपये थकबाकी रक्कम होती. यावर बॅँकेने 6 टक्के दराने 6 कोटी 31 लाख 96 हजार 224 रुपये व्याज वसुल केले आहे. तर विकास सोसायटींना 4.50 टक्के दराने 4 कोटी 39 लाख 25 हजार 577 रुपये व्याज सवलत मिळणार आहे. संबधित थकबाकीदार शेतकर्‍यांने थेट 4 कोटी 39 लाख रुपयांचा फायदा झाला आहे.

जत तालुक्यातील सर्वाधीत 267 शेतकर्‍यांचे 1 कोटी 92 लाख 33 हजार 380 रुपयांचे व्याज माफ झाले 

सर्वात कमी खानापूर तालुक्यातील 14 शेतकर्‍यांना 4 लाख 27 हजार 875 रुपये व्याज माफी मिळली. या व्याजाची तरतूद जिल्हा बॅँकेच्या नफ्यातून करण्यात येणार आहे. योजनेत आटपाडी तालुक्यातील 52, जत 267, कवठे महांकाळ 60, कडेगाव 36, खानापूर 14, पलूस 53, शिराळा 48, तासगाव 206, मिरज 172 तर वाळवा तालुक्यातील 57 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याने थंडा प्रतिसाद

शेतकर्‍यांच्या थकित कर्जाला ओटीएस योजना लागू करणारी सांगली जिल्हा बॅँक राज्यातील पहिली जिल्हा बॅँक आहे. मागील वर्षी या योजनेत शेतकर्‍यांना तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त व्याज माफी मिळाली. त्यामुळे बॅँकेने योजलेला मुदतवाढ दिली. मात्र या वर्षी लोकसभा, येणार्‍या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकार कर्जमाफीची घोषणा करेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. त्यातच जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनी कर्ज न भरण्याचे अवाहन करत शेतकर्‍यांची दिशाभूल केली. त्यामुळे शेतकर्‍यांनी या योजनेत फारसा सहभाग घेतला नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज