rajkiyalive

Pratik patil islampur : युथ आयडॉल- प्रतिकदादा पाटील !!

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांचा आज (शुक्रवार) वाढदिवस…त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा!!

युथ आयडॉल-  प्रतिकदादा पाटील !!

प्रतिकदादा हे काही वर्षापासून युवा वर्गाला संघटीत करून,समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा,सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दादा हे शांत,सयंमी व मितभाषी आहेत. त्यांचा पिंड सामाजिक कार्याचा आहे. मात्र एखादे काम हाती घेतले की,त्यासाठी झोकून देवून काम करण्याचा त्यांचा गुण निश्चितच कौतुकास्पद आहे

. दादांनी अमेरिकेत आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. ते काही वर्षांपासून वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील विविध समारंभ व कार्यात हिरीरीने भाग घेत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवकांचे संघटन करीत आहेत. जिल्ह्यातील युवकांच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ते युवा पिढीचे आशास्थान बनले आहेत.

m

लोकेनते स्व.राजारामबापू पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातून,तर आ.जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या शिवारात पाणी आणण्यापासून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. दादांनी आपल्या सार्वजनिक कार्याची सुरुवात वाळवा तालुक्यातील गोर-गरीब,दारिद्र्य रेषेखाली आयुष्य जगणाऱ्या कुटुंबांचे अश्रू पुसण्यापासून केली आहे. त्यांनी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या कामास मोठी गती दिली आहे. ते तालुक्यातील गोर-गरीब कुटुंबांना आरोग्य, शिक्षण,स्वयंरोजगार व त्यांच्या घरापर्यंत विविध योजना नेण्यासाठी कष्ट घेत आहेत.

त्यांनी इस्लामपूर व आष्टा येथे महाआरोग्य शिबीर घेवून रुग्णांच्यावर मोफत तपासणी व उपचार केलेले आहेत. दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट व इतर अवयव वाटपाचे काम केले आहे. असंख्य नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले आहेत.

दादांनी आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापूर व कोरोना काळात केलेल्या कामास तोड नाही. त्यांनी महा पुराच्या काळात रात्रीचा दिवस करून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची राहणे व जेवणाची व्यवस्था केली. शेतकऱ्यांचे पशुधनही जपण्याचे काम केले.

कोरोनाच्या काळात ‘न भूतो न भविष्यती’ असे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या परिस्थितीतही त्यांनी लोकांना धीर व मदतीचा हात दिला. जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. इस्लामपूर व आष्टा येथून साधारण १०० पेक्षा जादा ऑक्सिजन मशीन मोफत दिल्या. तालुक्यातील घरोघरी, तसेच पोलीस,आरोग्य सेवक व सफाई कामगारांनाही मास्क वाटप केले. ‘कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून लोकांची जेवणाची व्यवस्था केली.

सध्या शेतकऱ्यांच्यासमोर क्षारपड जमिनीचा गंभीर प्रश्न उभा आहे. त्यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय घेऊन गावोगावी शेतकरी परिसंवाद दौरा केला. आपल्या शेतकऱ्यांना कमी खर्चात,कमी वेळेत औषध फवारणी करता यावी,यासाठी ड्रोन प्रकल्प आणला. केवळ राज्यात नव्हे,तर देशात सर्वप्रथम त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे ड्रोन चळवळ सुरू झाली आहे. त्यांनी तालुक्यातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी कुक्कुटपालन योजना सुरू केली आहे. यामुळे तालुक्यातील महिलांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दादांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथे २४ वी राष्ट्रीय युवा व्हॉलीबॉल स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. आपल्या महाराष्ट्र राज्यास तिसऱ्यांदा आणि सांगली जिल्ह्यास प्रथमच मान मिळाला होता. मोठी जोखीम होती. मात्र दादांच्या नेतृत्वाखाली हे शिवधनुष्य लिलया पेलले. संपूर्ण देशातून आलेले खेळाडू,क्रीडा संघटक व राष्ट्रीय व्हॉलीबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘देशातील सर्वोत्तम स्पर्धा’या शब्दात स्पर्धेचे कौतुक केले. या स्पर्धेच्या निमित्ताने दादांच्या नेतृत्व कौशल्याची चुणूक पहायला मिळाली.

दादांनी इस्लामपूर शहरातील युवा व्यावसायिक व उद्योजकांना संघटीत करीत इस्लामपूर बिझनेस फोरम उभा केला. तालुक्यातील युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणे,या व्यावसायिक व उद्योजकांच्यामध्ये साखळी पध्दतीने व्यवसाय व उद्योगात वृद्धी करण्याचा प्रयत्न आहे. आयबीएफने फेब्रुवारी महिन्यात एक्स्पो २०२३ हे चार दिवसाचे राज्यस्तरीय प्रदर्शन घेतले. या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला असून चार दिवसात साधारण १२ ते १५ कोटी रुपयांचा व्यवसाय झालेला आहे.

दादांना प्राणिमात्रांचा फारच लळा आहे. महापुराच्या काळात त्यांनी नदीच्या प्रवाहात अडकलेल्या गाईस महत्प्रयासाने कारखाना कार्यस्थळावर आणून बरेच दिवस औषधो पचार केला होता. महापुराच्या काळात आपल्या माणसांची काळजी घेताना जनावरांचीही तितकीच काळजी घेतली आहे. सध्या त्यांनी कारखाना कार्यस्थळावर ‘सारथी ऍनिमल रेस्क्यू सेंटर’ सुरू केले आहे. येथे तालुक्यातील अपघातात जखमी,आजारी तसेच बेवारस कुत्र्यांचा उपचार व सांभाळ केला जात आहे. संपूर्ण राज्यात कदाचित हे पहिले आगळे-वेगळे सेंटर असावे.

लोकनेते राजारामबापू पाटील यांनी खून, मारामाऱ्यासाठी राज्यात प्रसिध्द वाळवा तालुक्यास विधायक वळण लावले. तालुक्या त सहकारी साखर कारखाना, बँक व दूध संघासह विविध सहकारी संस्थांचे जाळे विणत युवकांच्या हाताला काम दिले. तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावले.. बापूंच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,राज्याचे माजी जल संपदामंत्री आ.जयंतराव पाटील यांना सार्वजनिक जीवनात यावे लागले. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपले अमेरिके तील उच्च शिक्षण व आपल्या आशा- आकांक्षा अर्ध्यावर सोडून ते आले. तालुक्या तील कार्यकर्ते व जनतेनेही हे नेतृत्व तळाच्या फोडाप्रमाणे जपले आणि त्यांनीही गेल्या ३८ वर्षात सप्तपदी आमदार म्हणून जबाबदारी पहाताना तालुक्याला अभिमानस्पद कामगिरी केली आहे. त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात अर्थ,गृह,ग्राम विकास,जलसंपदा आदी खाती भूषवित राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान केलेले आहे. एक उच्च शिक्षित, सुसंस्कृत व अभ्यासू नेते म्हणून संपूर्ण राज्य त्यांना ओळखत आहे. त्यांनी स्व.बापूंनी उभा केलेल्या सहकारी संस्था जीवापाड जपत वाळवा तालुक्यात आर्थिक क्रांती घडवून आणली. त्यांच्या कुटुंबातील दादांच्या रूपाने तिसऱ्या पिढीने तालुक्याच्या सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
वाळवा तालुका हा राज्यातील एक समृद्ध, श्रीमंत व प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. याचे सारे श्रेय स्व.बापू व आ.जयंत राव पाटील यांनाच जाते. प्रतिकदादां हा समृध्दी व प्रगतीचा वारसा अधिक गतीने पुढे घेऊन जात आहेत. नुकतीच त्यांची राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना या मातृसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ते निश्चितच नवं-नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांचे हित जोपासत, कारखान्याच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान करतील,हा विश्वास आहे.
त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा।।

देवराज देशमुख,बोरगाव
कार्याध्यक्ष,वाळवा तालुका युवक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

शब्दांकन-विश्वनाथ पाटसुते

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज