rajkiyalive

SANGLI FLOOD NEWS : एसटी महामंडळाला बसला पुराचा फटका : 151 फेर्‍या केल्या रद्द : एका दिवसात 3 लाखांचे बुडाले उत्पन्न.

 

सांगली :

SANGLI FLOOD NEWS : एसटी महामंडळाला बसला पुराचा फटका : 151 फेर्‍या केल्या रद्द : एका दिवसात 3 लाखांचे बुडाले उत्पन्न. : कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील काही मार्गावर असणार्‍या पुलांवर पाणी आल्याने सदरचे पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत. या पुराचा फटका आता एसटी महामंडळाला देखील बसला आहे. गुरुवारी एका दिवसात एसटीच्या 151 फेर्‍या रद्द करण्यात आल्या यामध्ये 3 लाख 3 हजार 655 रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. काही मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. जिल्ह्यातील इस्लामपूर-कोडोली आणि शिराळा-बांबवडे या मार्गावरील एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

SANGLI FLOOD NEWS : एसटी महामंडळाला बसला पुराचा फटका : 151 फेर्‍या केल्या रद्द : एका दिवसात 3 लाखांचे बुडाले उत्पन्न.

चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात संततधार पाऊस सुरुच असल्याने पुराचा धोका वाढला आहे. कोयना धरणातून 31 हजार क्युसेक तर चांदोली धरणातून 21 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर असून कृष्णा नदीची इशारा पातळीकडे जात आहे.

जिल्ह्यातील 15 पूल आणि 27 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कणेगाव, भरतवाडी, देववाडी, चिकुर्डे गावातील नागरिक व पशुधनाचे स्थलांतर करण्यात आले. याचा फटका एसटी महामंडळाला देखील बसला आहे. जिल्ह्यातील विटा, इस्लामपूर, शिराळा पलूस आगारातून सुटणार्‍या काही बसची सेवा थांबविण्यात आली.

इस्लामपूर- कोडोली मार्गावरील ऐतवडे पुलावर पाणी आल्याने ही बस सेवा पूर्ण रद्द करण्यात आली आहे. विटा-कडेगाव मार्गावरील रामापूर पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील बस सेवा बलवली फाटा रामापूर या पर्यायी मागनि वळविण्यात आली आहे. शिराळा-कांडवण मार्गावरील आराळा-शित्तूर पुलावर पाणी आल्याने या मार्गावर आता मणदूरपर्यंत बस सोडण्यात आली आहे. शिराळा-बांबवडे मार्गावरील सागाव पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पलूस-कोल्हापूर मार्गावरील आमणापूर ते अंकलखोप पुलावर पाणी आल्याने यामार्गावरील वाहतूक आता इस्लामपूर व सांगली मार्गे वळवण्यात आली आहे.

एका दिवसात 151 फेर्‍या रद्द तर 3 लाखाचे बुडाले उत्पन्न..

वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक पूल पाण्याखाली गेल्याने एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. दिवसात 151 फेर्‍या रद्द झाल्या असून त्यात 3 लाख 3 हजार 658 रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. सांगली आगारातील 30 फेर्‍या रद्द झाल्या असून 1 लाख 34 हजार 380 रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

मिरज 26 फेर्‍या 1 लाख 2 हजार 645 रुपयांचे उत्पन्न, इस्लामपूर 37 फेर्‍या 18 हजार 253 रुपये, तासगाव एक फेरी 1 हजार 268 रुपये, आटपाडी एक फेरी 2 हजार 671 रुपये, कवठेमहांकाळ दोन फेर्‍या 8 हजार 235 रुपये, शिराळा 48 फेर्‍या 22 हजार 493 रुपये आणि पलूस सहा फेर्‍या 5 हजार 103 रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज