rajkiyalive

RELIANCE JIO : रिलायन्स जिओकडून 350 कोटींची जीबी डेटा फसवणूक; राजू शेट्टी यांचा खळबळजनक आरोप

कोल्हापूर :

RELIANCE JIO : रिलायन्स जिओकडून 350 कोटींची जीबी डेटा फसवणूक; राजू शेट्टी यांचा खळबळजनक आरोप : रिलायन्स जीओ या मोबाईल सेवा पुरवणार्‍या कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणार्‍या जीबी डेटा मध्ये 300 ते 350 कोटींची फसवणूक केली जाते असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा , दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्रव्यवहार करून या संदर्भातील माहिती दिली आहे.

RELIANCE JIO : रिलायन्स जिओकडून 350 कोटींची जीबी डेटा फसवणूक; राजू शेट्टी यांचा खळबळजनक आरोप

देशभरातील 106 कोटींहून अधिक मोबाईल धारकांना रिलायन्स जिओ , व्होडाफोन आयडिया व भारती एअरटेल या कंपन्यांकडून 1 जुलैपासून मोबाईल सेवांच्या (रिचार्जच्या) दरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. खरे तर या कंपन्यांकडून दररोज ग्राहकांना इंटरनेट वापरासाठी दिल्या जाणा-या जीबी डाटा मध्ये हेराफेरी होत असून दररोजच्या वापरातील कोणताही डेटा या कंपन्यांकडून ग्राहकांना दिला जात नाही. यामधून एका रिलायन्स जीओ कंपनीकडून 300 ते 350 कोटी जीबी डेटाची फसवणूक होत आहे.

700 ते 800 कोटी जीबी डेटा या कंपन्यांकडून चोरी करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.

देशामध्ये 106 कोटी मोबाईल धारक दैनंदिन प्रति महिना सरासरी 22 जीबी इंटरनेट डेटा वापर गृहीत धरता वरील सर्व कंपन्यांची मिळून जवळपास 2600 कोटी जीबी डेटा दरमहा ग्राहकांना वापरास दिला जातो. यामधील 700 ते 800 कोटी जीबी डेटा या कंपन्यांकडून चोरी करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. या डेटा मधून ग्राहक फेसबुक , एक्स (ट्वीटर ) , इंन्स्टाग्राम , व्हॅाटसअप , रिल्स , युट्यूब याकरिता या डेटाचा वापर करतात.

मात्र वरील कंपन्यांच्यावतीने जो डेटा दिला जातो त्यातून तो डेटा कशा कशासाठी, किती जीबी किंवा एमबी वापरला जातो याची कशाचीच माहिती ग्राहकांना दिली जात नाही. या डेटा वापरामध्ये ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याची दिसून येत आहे. याबाबत केंद्र सरकारने तातडीने या कंपन्यांना सेवा प्रदात्याने घोषित केलेल्या गतीनुसार नेटवर्क कनेक्शनच्या इंटरनेट गतीचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

इंटरनेट स्पीड मोजण्यासाठी वापरलेली उपकरणे कॅलिब्रेट केली पाहिजेत, अन्यथा ग्राहकांची नेहमीच फसवणूक होणार आहे.

देशातील मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांकडून प्रतिमहिना आकारण्यात आलेल्या रिचार्जवरून दैनंदिन सरासरी 6 रूपये 81 पैसे प्रति ग्राहक सेवा शुल्क वसूल केले जाते. यामधून या कंपन्याना दैनंदिन सरासरी 722 कोटी रूपये तर मासिक 21660 हजार कोटी रूपयाचे उत्पन्न मिळते यापैकी दरमहा 5 हजार 400 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कमेची या डेटा चोरीतून ग्राहकांची फसवणूक होत आहे.

यामुळे वरील कंपन्यांनी फेसबुक , एक्स (ट्वीटर ) , इंन्स्टाग्राम , व्हॅाटसअप , रिल्स , युट्यूब याकरिता किती डेटाचा वापर केला जातो त्याचा सेवा प्रदात्याने घोषित केलेल्या गतीनुसार नेटवर्क कनेक्शनच्या इंटरनेट गतीचे परीक्षण करून इंटरनेट स्पीड मोजण्यासाठी वापरलेली उपकरणे कॅलिब्रेट केली पाहिजेतक. याचा दैनंदिन मेसेज संबधित ग्राहकांना पाठविण्याची मागणी शेट्टी यांनी मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज