rajkiyalive

maratha kranti morcha : सांगलीत मनोज जरांगे-पाटलांचा एल्गार

जनप्रवास । सांगली

maratha kranti morcha : सांगलीत मनोज जरांगे-पाटलांचा एल्गार : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरु झाला. गुरुवारी (दि. 8) ते सांगली जिल्ह्यात येणार आहेत. जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृतीसाठी जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात येणार आहे.

maratha kranti morcha : सांगलीत मनोज जरांगे-पाटलांचा एल्गार

सभेची तयारी पूर्ण, विश्रामबाग चौक ते राम मंदिर शांतता रॅली निघणार

या सभेला जिल्ह्यातील मराठा समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात मनोज जरांगे हे सहभागी झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली होती. आरक्षणाच्या मागणीसठी सांगलीतही शांतता मोर्चा काढण्यात आला होता. जरांगे-पाटील यांच्या दौर्‍यावेळी समाजातील लोकांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई येथे झालेल्या मोर्चाला सांगलीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते गेले होते. लोकसभा निवडणुकीत जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा सत्ताधार्‍यांना मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. या निवडणुकीत राज्यातील सर्व 288 जागावरील उमेदवार पाडा सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यावेळी त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा 7 ऑगस्टपासून सुरु झाला आहे 7 ऑगस्टला सोलापूर येथे जाहीर सभा झाली. त्यानंतर गुरुवारी (दि. 8) सांगली जिल्ह्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर त्यांच्या दौर्‍याचे नियोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी दुपारी 1 वाजता सांगोला मार्गे नागज येथे येणार आहेत. तिथून पुढे शिरढोण मार्गे मिरज येथे येत आहेत. मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मिशन हॉस्पिटल चौक मार्गे सांगलीमध्ये येतील.

मिरजेतून रॅली अंदाजे दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. विश्रामबाग ते राम मंदिर मराठा क्रांती मोर्चा चौकात शांतता रॅली काढली जाईल. सायंकाळी 5 वाजता रॅलीचे रुपांतर सभेत होणार आहे. गुरुवारी सायंकाळी जाहीर सभा संपल्यानंतर जरांगे-पाटील यांचा सांगलीत मुक्काम करणार आहेत. शुक्रवारी (दि. 9) रोजी सकाळी 9 वाजता सांगलीहून कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. जरांगे-पाटील यांच्या दौर्‍याची तयारी पूर्ण झाली असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

जरांगे-पाटील यांचा सांगलीत मुक्काम
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आगामी काळातील आपल्या राजकारणाची काय दिशा असेल याबाबत येत्या 29 ऑगस्टला निर्णय घेणार आहेत. यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. मनोज जरांगे यांनी आत्ताच निर्णय घेतला नसला तरी आगामी काळातील राजकारणाची त्यांची दिशा काय असेल, याबाबत मात्र सुतोवाच आधीच दिले आहेत. या परिस्थितीत जरांगे-पाटील गुरुवारी सांगलीत मुक्काम करणार आहेत. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून इच्छुक जरांगे-पाटील यांची भेट घेणार का? याकडेही लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज