rajkiyalive

राज्यातील पहिलीच फायबर पॉलिमरची 21 फुटी श्रीमंत महागणपती मंडळाची श्रींची सुंदरमुर्ती

मिरज / प्रतिनिधी
राज्यातील पहिलीच फायबर पॉलिमरची 21 फुटी श्रीमंत महागणपती मंडळाची श्रींची सुंदरमुर्ती : मिरजेतील कर्मवीर भाऊराव चौकात असलेल्या श्रीमंत महागणपती मंडळाची राज्यातील पहिलीच फायबर पॉलिमरची 21 फुटी श्रीमंत महागणपती सुंदरमुर्ती साकारली आहे. या मंडळाची स्थापना 2008 साली झाली असून पर्यावरण पुरक अशी गणपतीची मुर्ती बनविली असून कायम स्वरूपी ही मुर्ती उत्सवात त्याची पूजा केली जाणार असल्याची माहिती मंडळ संस्थापक अभिजीत कातरकी व अमित, तसेच खजिनदार सागर चौगुले, अध्यक्ष अजिंक्य आमटे, उपाध्यक्ष ऐश्वर्या धुमाळ, खजिनदार मनोज चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली.

राज्यातील पहिलीच फायबर पॉलिमरची 21 फुटी श्रीमंत महागणपती मंडळाची श्रींची सुंदरमुर्ती

अध्यक्ष अजिंक्य आमटे म्हणाले की, श्रीमंतमहागणपती मंडळाचे यंदाचे 17 वर्ष असून 16 वर्षांच्या कालावधीत या मंडळाने गणेशोत्सवाचे पावित्र्य राखत, तो पारंपारिक, पर्यावरणपुरक उत्सव करण्याचा नेहेमीच प्रयत्न केलेला आणि या ही पुढे तसाच प्रयत्न राहील आणि म्हणुनच यंदाचे गणेशोत्सवाच वर्ष हे फक्त श्रीमंत महागणपती मंडळासाठीच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रासाठी नाविण्यपुर्ण असणार आहे. राज्यातील महिलीच अशा पध्दतीची फायबर पॉलिमरची मुर्ती बनविली आहे.

मंडळाच्या उपाध्यक्षा ऐश्वर्या धुमाळ म्हणाल्या, श्रीमंत महागणपती मंडळाच्या उपाध्यक्ष म्हणून मला संधी दिली आहे. महिलांना उपाध्यक्षपदाचा मान मंडळाने दिला आहे. यावर्षीचा श्रीमंत महागणपती हा नव्या दिव्य भव्य रुपात साकारतोय. दरवर्षी आम्ही आमचा उत्सव डॅाल्बी मुक्त पण पारंपारिक ढोलताशांच्या गजरात भक्तीभावाने पार पाडत आलो आहोत.

रेझिन फायबरपासून बनवलेल्या मूर्तींही माती किंवा प्लास्टरपासून बनवलेल्या पारंपरिक मूर्तींच्या तुलनेत रेझिन फायबरच्या मूर्ती अधिक टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणार्या असतात. पाणी आणि आर्द्रतेला प्रतिरोधक असतात, ज्यामुळे ते बाहेरच्या वापरासाठी किंवा दमट वातावरणातही टीकतात. रेझिन फायबरच्या मूर्ती तुलनेने हलक्या असतात, ज्यामुळे त्यांची वाहतूक आणि हाताळणी सुलभ होते. कमीतकमी देखभाल आवश्यक आहे आणि मऊ कापडाने सहजपणे साफ करता येते. मूर्तीच्या डिझाइनमध्ये अधिक अष्टपैलुत्व प्राप्त होते. मूर्ती तापमान आणि हवामानाचा सामना करू शकतात. रेझिन फायबरच्या मूर्तींना तडा जात नाही किंवा सहजपणे तुटत नाही, ज्यामुळे त्या दीर्घकाळ टिकून राहतात.

यावेळी अभिजीत धुमाळ, सागर चौगुले, सुनील दिवान मल, गणेश चौंडीकर, संकेत परचुरे , विनय जोशी ,सोमनाथ मालगावे मच्छिंद्र वाघमारे विकास चव्हाण, शितल दस्तानी,पराग पिड्डे , अनुप अहुजा, प्रतीक पवार,अमोल सरवदे, प्रमोद माने, विनोद माने, व्यंकटेश ताडे,अक्षय चौगुले, रोहित ओमासे, रोनक ठक्कर, अनुज शहा,फाल्गुन ठक्कर, बबूल चूग, डॉक्टर जीवन माळी, डॉक्टर हर्षल कुलकर्णी, डॉक्टर सचिन कोठावळे, डॉक्टर राहुल चौगुले, प्रतीक सूर्यवंशी, सौरभ दुर्गाडे सर्व सदस्य उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज