rajkiyalive

BJP TRUBBAL IN KOLHAPUR : महायुतीला कोल्हापुरातील अपक्ष आमदार स्वत:च्या पक्षाकडून लढणार?

BJP TRUBBAL IN KOLHAPUR : महायुतीला कोल्हापुरातील अपक्ष आमदार स्वत:च्या पक्षाकडून लढणार? : कोल्हापूर जिल्ह्यात विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती, आ. प्रकाश आवाडे यांचे ताराराणी आघाडी हे पक्ष असताना आता शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही आपला स्वत:चा पक्ष काढल्याने हे तीन्ही आमदार महायुतीत असूनही स्वत:च्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे.

BJP TRUBBAL IN KOLHAPUR : महायुतीला कोल्हापुरातील अपक्ष आमदार स्वत:च्या पक्षाकडून लढणार?

सध्या आघाडीचे राजकारण सर्वत्र सुरू आहे. याचा राजेंद्र पाटील यड्रावकरांनी चांगलाच फायदा करून घेतला आहेे. गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडणुक लढवून पहिल्यांदाच आमदार झालेल्या यड्रावकरांनी काळाची पावले ओळखून शिवसेनेच्या गोटात दाखल झाले आणि मंत्रीपद पदरात पाडून घेतले. पुन्हा राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. त्यावेळी त्यांनी शिंदे गटात झाले. आता पुन्हा त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी राजश्री शाहू आघाडी हा नवा पक्ष काढल्यामुळे आता यड्रावकर याच पक्षाकडून लढणार यात शंका नाही. आवाडेही राहूल आवाडे यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. तेही भाजपची वाट न पाहता आपल्या ताराराणी पक्षाकडून मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. विनय कोरेंचा तर जनसुराज्य शक्ती हा पक्ष आहेत. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर सत्तास्थापनेवेळी ते कोणताही निर्णय घेवू शकतात.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे आणि नव्याने स्थापन झालेल्या राजर्षी शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर या तिन्ही साखर सम्राट माजी मंत्र्यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. याचा फटका महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत तिघांनी अपक्ष म्हणून लढून यश मिळवले. त्यापैकी विनय कोरे यांनी आपल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून झेंडा रोवला. जनसुराज्य पक्ष हा भाजपला पाठिंबा दिलेला सहयोगी पक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोरे यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांनी भाजपकडे 15 जागांची मागणी केली आहे. कोल्हापुरात त्यांचा स्वतःचा पन्हाळा, शेजारचा हातकणंगले राखीव, करवीर या मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे.

शिरोळचे भाजपचे अशोक माने हे गेल्यावेळी जनसुराज्य कडून लढले होते. यावेळी कोरे त्यांना पुन्हा संधी देतील अशी शक्यता आहे. करवीर मध्ये सध्या शिंदे छावणीत असलेले माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दोनदा विजय मिळवला होता. येथे कोरे यांनी आता संताजी घोरपडे या उमद्या चेहर्‍याला रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याने युतीत तणाव आहे. इचलकरंजीमध्ये महायुतीचे गणित नीट जुळत नसेल तर अजित पवार राष्ट्रवादी मध्ये असलेले इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे हा नवा चेहरा जनसुराज्यकडून असू शकतो. त्यामुळे कोरे यांच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करणे हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोरचे आव्हान असणार आहे.

इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांची प्रतिक्षा यादी संपत नाही. या प्रकाराला कंटाळून आता या वेळच्या निवडणुकीत त्यांनी पुत्र राहुल आवाडे यांना आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे. याच वेळी हातकणंगलेमध्ये जयश्री कुरणे यांची उमेदवारी जाहीर करून दबाव वाढवला आहे. शिरोळ मध्ये आमदार राजेंद्र पाटील यांची भूमिका काय ठरते आणि महायुतीचा निर्णय काय होतो हे पाहून येथे आवाडे आपला उमेदवार जाहीर करतील असे दिसत आहे. यामुळे इचलकरंजी येथेही देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालून महायुतीत टोकदार तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल असे चित्र आहे.

शिरोळ तालुक्यात अनपेक्षित राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या छावणीतून ठाकरे सेने कडे आणि तेथून शिंदे सेनेकडे आलेले राजेंद्र पाटील यांच्यासमोर कोणता झेंडा घेऊ हाती असा पेच निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीला राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले असल्याने त्यांची मनस्थिती द्विधा झाली आहे . त्यांनी राजर्षी शाहू आघाडी स्थापन करून परिवर्तनाच्या दिशेने जात असल्याचा संदेश दिला आहे. त्यांचे बंधू जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत. तर शिरोळमध्ये यड्रावकर आमचे उमेदवार असतील असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

त्यामुळे राजेंद्र पाटील हे पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत स्वगृही परतणार की राज्यातील मतदारांचा बदललेला कल लक्षात घेऊन शाहू आघाडीच्या माध्यमातून मध्यम मार्गी वाटचाल करणार हे महत्त्वाचे ठरले आहे. या घडामोडी पाहता आमदार पाटील यड्रावकर यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांना येथे लक्ष घालण्याची वेळ आली आहे. एकंदरीत कोल्हापूरातील तिन्ही अपक्ष आमदारांनी घेतलेली भूमिका आणखी टोकदार होण्यापूर्वीच मार्ग काढण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना झटावे लागेल असे दिसत आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज