rajkiyalive

BJP NEWS : संजयकाकांची घरात घुसून माजी उपनगराध्यक्षांना मारहाण

पाच जनांवर गुन्हे दाखल; स्वीय सहाय्यकाला मारहाणीवरून कृत्य : विरोधी तिघांवरही गुन्हे

कवठेमहांकाळ :

BJP NEWS : संजयकाकांची घरात घुसून माजी उपनगराध्यक्षांना मारहाण : कवठेमहांकाळमध्ये पुन्हा आर. आर. पाटील गट आणि संजयकाका गटात संघर्ष उफाळून आला. माजी खासदार संजयकाका यांनी स्वीय सहाय्यकाला मारहाणीवरून कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना कार्यकर्त्यांसमवेत घरात घुसून मारहाण केली. या प्रकरणी संजयकाकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यावरून रात्री संजयकाकांसह स्वीय सहाय्यक खंडू होवाळे व अनोळखी चार पांच व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे स्वीय सहाय्यकाच्या फिर्यादीवरून मुल्लांसह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.

BJP NEWS : संजयकाकांची घरात घुसून माजी उपनगराध्यक्षांना मारहाण

मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यासह जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून बसला होते.
कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी केलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार पाटील यांनी आपल्या समर्थकासह घरात घुसून मारहाण केली. तसेच घरातील महिला व मुलांनाही मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मारहाणीपासून वाचविण्यासाठी पुढे आलेल्या 76 वर्षाच्या आईलाही माजी खासदारांनी ढकलून दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली.

पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी कवठेमहाकांळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास अर्ज भरण्यासाठी मदत करत असल्याच्या कारणावरून माजी खा.संजयकाका पाटील व त्यांचे स्वीय सहायक खंडू होवाळे यांच्यासह इतर अनोळखी चार पाच व्यक्तीनी अय्याज मुल्ला यास त्यांच्या दादा चौक येथील राहत्या घरी शुक्रवार 27 रोजी सकाळी 7.30 वाजता फिर्यादीच्या घरात जावून जोर जोराने शिविगाळ करत मारहाण केली व फिर्यादी यांचा मुलगा कैफ व पुतण्या एजाज व अनिस आणि आई हाजराबी यांना ढकलून खाली पाडले व तु भविष्यात जिवंत कसा रहातो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले

दरम्यान, या घटनेबाबत माजी खासदार पाटील यांनी सांगितले, शुक्रवारी रात्री स्वीय सहायक खंडू होवाळे यांना मुल्ला, बाळासाहेब पाटील व पिंटू कोळेकर या तिघांनी मारहाण केली होती. ही माहिती मिळताच आज विचारणा करण्यासाठी मी मुल्ला यांच्या घरी गेलो होतो. मात्र, त्यांची भाषा अर्वाच्च व ताणून मारण्याची होती. यामुळे संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने दोन थोबाडीत लगावल्या. होवाळे याला झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकारावरून कवठेमहांकाळमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गुंडगिरी विरूध्द शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज