rajkiyalive

KHANAPUR VIDHANSABHA : सुहासभैय्यांना विधानसभेत  पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ’टाईट फिल्डिंग’

1 ऑक्टोबर रोजी मतदारसंघाच्या दौर्‍यावर ; मतदारांशी ’दुवा’ साधण्याचा करणार प्रयत्न

विटा / प्रताप मेटकरी
KHANAPUR VIDHANSABHA : सुहासभैय्यांना विधानसभेत  पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ’टाईट फिल्डिंग’ :राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्या क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या खानापूर विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांना कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचा धडाका लावला आहे. कोणत्याही परिस्थितीत दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना विधानसभेत घेऊन जायचंच असा चंग त्यांनी बांधला आहे. त्यासाठी ’टाईट फिल्डिंग’ लावली आहे. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचा शुभारंभ आणि विविध शासकीय विकासकामांच्या शुभारंभ निमित्त येत्या 2 ऑक्टोबर रोजी खानापूर मतदारसंघात थेट येऊन मतदारांशी ’दुवा’ साधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

KHANAPUR VIDHANSABHA : सुहासभैय्यांना विधानसभेत  पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ’टाईट फिल्डिंग’

खानापूर विधानसभा मतदारसंघ हा 2014 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आजवर दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांनी या मतदारसंघाचे 4 टर्म प्रतिनिधीत्व केल्यामुळे या मतदारसंघावर बाबर गटाचे प्राबल्य राहिले आहे. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणात अनिलभाऊ बाबर यांनी ठाकरे गटाला यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाच्या राजकीय बंडात सहभागी होत शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सर्वात अग्रेसर भूमिका दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांची होती. मुख्यमंत्री शिंदे व स्वर्गीय आमदार बाबर यांचे अत्यंत निकटचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. आमदार बाबर हयात असताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभा मतदारसंघासाठी प्रचंड निधी दिला होता.

आमदार बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक

दरम्यान आठ महिन्यांपूर्वी आमदार बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. अनिलभाऊंच्या पश्चात त्यांचे सुपुत्र युवक नेते सुहास बाबर व अमोल बाबर यांच्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांची विशेष मर्जी राहिली आहे. त्यांनी आमदार बाबर यांच्या पश्चात बाबर यांच्या सुपुत्रांना मदत करण्याची भूमिका ठेवली आहे. तर बाबर बंधूंनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी तोच जिव्हाळा कायम ठेवला आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी ही सुहास बाबर यांचे काम अधिकाधिक सुकर व्हावे या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः आपल्या टीमसह या दौर्‍याच्या निमित्ताने मतदारसंघात येत आहेत.

BABAR.pdf 1
सध्या राज्यात आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले झाले आहे.

त्यात सांगली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा एकमेव खानापूर विधानसभा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी आणि सुहास बाबर यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणा सज्ज केली आहे.

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचा शुभारंभ आणि विविध विकासकामांच्या उदघाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित करत दौरा आखला आहे. 2 ऑक्टोबर रोजीच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावर आपले विशेष लक्ष दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत सुहास बाबर यांना विधानसभेत आपल्यासोबत जनतेतून निवडून आणून घेऊन जायचेच यासाठी स्वतः प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे.

दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने मोर्चेबांधणी करण्यास जोरदार सुरुवात झाली आहे. दस्तूरखुद्द स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघासाठी सर्वाधिक वेळ देणार आहेत. सुहास बाबर यांच्यासाठी पदाधिकार्‍यांशी संवाद साधून व्यूहरचना आखणार आहेत. त्यामुळे या हक्काचा बालेकिल्ला असणार्‍या खानापूर मतदारसंघावर शिंदे गटाने अधिकचे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौर्‍याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

…निमित्त टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे प्रचार विधानसभेचा

खानापूर विधानसभा मतदारसंघात खानापूर आणि आटपाडी हे दोन तालुके आणि तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील 21 गावे येतात. या मतदारसंघातील टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचा शुभारंभ आणि विविध शासकीय विकासकामांचा शुभारंभ येत्या 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. हे सर्व कार्यक्रम शासकीय असले तरी एकंदरीतच या कार्यक्रमाला प्रचाराची झालर आहे. त्यामुळे निमित्त टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे मात्र प्रचार विधानसभा निवडणूकीचा असे चित्र आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज