rajkiyalive

miraj vidhansabha 2024 : आम्ही सर्व नगरसेवक महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार : संजय मेंढे

कोणीही भाजपला आमचा पाठिंबा असल्याचे समजू नये.

मिरज / प्रतिनिधी

miraj vidhansabha 2024 : आम्ही सर्व नगरसेवक महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार : संजय मेंढे विकासकामासाठी पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी निधी दिला हो0ता. त्यांचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस नगरसेवक म्हणून आम्ही पालकमंत्र्यांच्या बैठकीत बसलो होतो. त्यामुळे कोणीही भाजपला आमचा पाठिंबा असल्याचे समजू नये. आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचा यु टर्न काँग्रेस शहर अध्यक्ष संजय मेंढे यांनी पत्रकार बैठकीत दिला. यावेळी अय्याज नायकवडी, करण जामदार, वहिदा नायकवडी तसेच आजी, माजी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

miraj vidhansabha 2024 : आम्ही सर्व नगरसेवक महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार : संजय मेंढे

संजय मेंढे म्हणाले, पालकमंत्र्यांनी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता विकास निधी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आभारासाठी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे कोणीतरी काहीही सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. आम्ही काँग्रेसचे नगरसेवक आहोत. विशालदादा पाटील, विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील हे आमचे नेते आहेत. आम्ही काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आहे. विनाकारण कोणी काही सांगितले म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा दिला असे होत नाही. आमच्या विरोधात काम करणार्‍यांनी मुद्दाम अशी माहिती दिली. त्यामुळे सर्वत्र चुकीची माहिती सर्वांसमोर आली. या बैठकीत भाजप पक्षाला पाठिंबा आहे, असा कोणतीही विधान मी केलं नाही.

संजय मेंढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही राहणार आहे. मिरज विधानसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळेल, त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू. आम्ही त्यावेळी तेथून गेल्यानंतर काहींनी काँग्रेसचाही पाठिंबा भाजपला आहे, असे वक्तव्य चुकीचं असून मुद्दाम केलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अय्याजभाई नायकवडी म्हणाले, काहीवेळी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. त्यामुळे गैरसमज झाले आहेत. जोपर्यंत भाजपच्या उमेदवाराला पराभूत करत नाही तोपर्यंत आम्ही सर्व काँग्रेसचे उमेदवार एकसंघ राहणार आहोत. कोणीही काहीही सांगेल आणि भाजपला काँग्रेसला पाठिंबा असे सांगतील पण ते चुकीचे आहे. आम्ही सर्व एकसंघ आहोत. पालकमंत्र्यांनी निधी दिला आहे पालकमंत्री हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जिल्ह्याचे असतात त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आभारासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहिले म्हणजे भाजपला पाठिंबा असे होत नाही. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने सांगितले आहे. तसेच मिरज ग्रामीण भागातील काँग्रेसही महाविकास आघाडीचा धर्म पाळून उमेदवाराला निवडून आणणार आहे. सुंदोपसुंदी आजिबात नाही. आम्ही सर्व काँग्रेसचे नगरसेवक एकसंघ आहोत.

ते पुढे म्हणाले, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आघाडी आहे. त्यामुळे मिरज विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. महाविकास आघाडीच्यावतीने जो उमेदवार ठरेल त्याच्या पाठिमागे आम्ही राहणार आहोत. मग तो उमेदवार आयात असेल किंवा भाजपमधून आला असेल तर त्याला पक्षाचे ध्येय धोरण मंजूर असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिमागे ठामपणे उभे राहणार असल्याचे अय्याज नायकवडी यांनी सांगितले.

सोशल मिडियाच्या माध्यमातून वेगळ्या भूमिका मुद्दामहून मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेसचे आजी, माजी नगरसेवक एकत्र आलो आहोत. भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आमचे प्राधान्य आहे, असेही अय्याज नायकवडी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज