इस्लामपूर दि. 30 (प्रतिनिधी)
SANGLI NEWS : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत सुनीता चौगुले प्रथम: वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कवठेपिरान येथे घेतलेल्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेत सुनिता चौगुले यांनी प्रथम क्रमांक, सरिता पाटील यांनी व्दितीय क्रमांक, तर रेणू पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या विजेत्या महिलांना राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,तालुका संघटक दिलशाद मुजावर, रुपाली तेली प्रामुख्याने उपस्थित होते.
SANGLI NEWS : वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत सुनीता चौगुले प्रथम
प्रतिकदादा पाटील म्हणाले, महिला राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 30 गावामध्ये ही स्पर्धा घेतली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांनी इको फ्रेंडली सामाजिक संदेश देणार्या गृह सजावटी केल्या होत्या. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभागी होत या स्पर्धेच्या आनंद घेतला आहे.

प्रारंभी महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुनिता देशमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात स्पर्धेचा आढावा मांडला. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य पै.भिमराव माने,माजी सभापती दत्तात्रय पाटील,युवा उद्योजक सचिन पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



