खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उडाली खळबळ
प्रताप मेटकरी/विटा
khanapur vidhansabha : …अन आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील आले एकत्र : दुष्काळी पट्ट्याचा बुलंद आवाज, उत्कृष्ट संसदपटू आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रत्यक्ष भेटून राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर आणि अॅड. वैभव पाटील एकत्र आल्याने खानापूर मतदारसंघाच्या राजकीय पटलावर मात्र एकच खळबळ उडाली आहे. आमदार पडळकर आणि वैभवदादाच्या आजच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विधानसभा निवडणूकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.
khanapur vidhansabha : …अन आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील आले एकत्र
वैभव पाटील हे सध्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात आहेत. हा पक्ष महायुतीतील एक घटकपक्ष आहे. खानापूर मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेलाच जाणार असल्याने वैभव पाटील कोणत्या पक्षातून उभा राहणार ? याकडेच मतदारसंघाच्या सर्वांच्या नजरा आहेत. कोणत्याही परिस्थितीत मैदान मारणारच असा चंग बांधून ते तयारी करत आहेत. ते पक्ष बदलून शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीकडे लवकर वळणार असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे आमदार पडळकर यांचे जेष्ठ बंधू माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्याची भूमिका घेत मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे.
दरम्यान आज वैभव पाटील यांनी बेरजेचे राजकारण करत विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवा राजकीय डाव टाकत आमदार पडळकर यांना वाढदिवसानिमित्त झरे येथील गेस्ट हाऊसवर जात शुभेच्छा दिल्याने आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमधील भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आटपाडी तालुक्यातून कोण कुणाला साथ देणार ? यावर निवडणूकीची गणिते ठरलेली असतात. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील यांच्यातील आज झालेल्या या भेटीने मात्र मतदारसंघात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.