rajkiyalive

sangli crime news : सिंदूर येथे सडलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृत्यू

जत :

sangli crime news : सिंदूर येथे सडलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृत्यू : जत तालुक्यातील सिंदूर येथील रामगोंडा परगोंडा पाटील (वय 26) या तरुणाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. शवविच्छेदनात पोटात विष गेल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. तरीही गावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची चर्चा असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.

sangli crime news : सिंदूर येथे सडलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृत्यू

रामगोंडा हा उच्चशिक्षित असून तो बंगलोर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. 15 दिवसांपूर्वी तो सुट्टीवर गावी आला होता. दोन दिवसांपूर्वी कामावर जातो, असे सांगून तो घरातून निघून गेला. तो बंगलोरला गेला असे समजून घरातील लोक नेहमीचे कामे करत होते. सोमवारी सकाळी त्यांचाच शेतात मका काढण्यात पिकात सडलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी घरातल्यांना माहिती दिली. जी घटना कळताच गावकरी घटनास्थळी आले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी जतच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र ओळख पटत नसल्याने सायंकाळपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नाही. अखेर सायंकाळी नातेवाईक आल्यानंतर ओळख पटली. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पोटात विष गेल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

गावात चर्चेला उधाण

रामगोंडा याचा मृतदेह मिळून आल्यानंतर गावात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले. अनेकांनी त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज