सांगली :
sangli crime news : चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार : : संशयित पतीला केली अटक. : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तू नांदायला का येत नाहीस असे म्हणून चाकूने पोटात भोसकून शरीरावर वार करत पतीने खुनी हल्ला केल्याची धक्कादाक घटना घडली. सदरची घटना हि शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईदगाह मैदान परिसरात घडली. या हल्ल्यात शांती उर्फ कोमल सुशांत तुपसौंदर्य (वय 24 रा. म्हाडा कॉलनी, संजयनगर) या गंभरी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
sangli crime news : चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार : : संशयित पतीला केली अटक.
या प्रकरणी अवाक्का मुरगेश कोबाल (वय 45 रा. जुना बुधगाव रोड, कोरे बिल्डिंग) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पती सुशांत शहाजी तुपसौंदर्य (वय 28 रा. म्हाडा कॉलनी, संजयनगर) याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जखमी शांती उर्फ कोमलचे लग्न संशयित सुशांत याच्याशी झाले होते. लग्नानंतर पती-पत्नी संजयनगर परिसरातील म्हाडा कॉलनी मध्ये राहत होते. पती सुशांत हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने कोमल या माहेरी आल्या होत्या. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोमल या त्यांच्या आई अवाक्का यांच्या सोबत घरी असताना संशयित सुशांत तुपसौंदर्य हा त्याठिकाणी गेला. तुला माझ्या पेक्षा मोबाईल महत्वाचा आहे का?, तू नांदायला का येत नाहीस असे म्हणून चारित्र्यावर संशय घेत तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून सोबत आणलेल्या चाकूने कोमल यांच्या पोटात भोसकले. यानंतर त्यांच्या खांद्यावर, पाठीवर आणि गुडघ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात कोमल या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घडलेल्या या घटनेनंतर कोमल यांच्या आई अवाक्का कोबाल यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाचा पंचनामा करत संशयित पती सुशांत तुपसौंदर्य याला ताब्यात घेत अटक केली. आज त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



