लिंगनूर : sangli crime news : ट्रॅक्टरखाली सापडून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, देवीची मूर्ती विसर्जनानंतर परताना घडली दुर्दैवी घटना ” लिंगनूर (ता. मिरज) येथे दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्या स्वरूप ज्ञानेश्वर शिंदे (वय 9 वर्षे) या शाळकरी मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
sangli crime news : ट्रॅक्टरखाली सापडून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, देवीची मूर्ती विसर्जनानंतर परताना घडली दुर्दैवी घटना
शिंदे मळा येथे नवरात्रीमध्ये दुर्गा मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. काल, रविवारी रात्री मिरवणुकीने मूर्तीचे बंधार्यात विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत वस्तीतील ग्रामस्थ व मुले सहभागी झाली होती. स्वरूपदेखील मिरवणुकीत सहभागी झाला होता. विसर्जनानंतर रात्री दहा वाजता घराकडे परतताना होता. सर्वजण वस्तीजवळ आले, तेव्हा मागून मिरवणुकीचा रिकामा ट्रॅक्टर आला. त्यावेळी स्वरूप ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी गेला, पण चढत असताना तोल जाऊन खाली पडला. त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.
एकुलता एक मुलगा
अचानक झालेल्या या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ माजली. कुटुंबियांनी स्वरूपला तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. स्वरूपच्या मृत्यूचे वृत्त समजताच लिंगनूर, शिंदे मळा परिसरात शोककळा पसरली. स्वरूप तिसरीच्या वर्गात शिकत होता. तो एकुलता एक मुलगा होता. वडील ज्ञानेश्वर शिंदे लिंगनूरचे माजी सरपंच आहेत. मिरज ग्रामिण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.