मुंबई :
congress nwes : काँग्रेसची पहिली यादी जाहीर : महाविकास आघाडीतल्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाने नागपूर, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र यातील मतदारसंघांसह एकूण 48 जागा जाहीर केल्या आहेत. आमचं 85-85-85 जागांचं ठरलं आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. आता दोन पक्षांनी नावं जाहीर केल्यानंतर काँग्रेसची यादीही जाहीर झाली आहे.
congress nwes : काँग्रेसची पहिली यादी जाहीर :
काँग्रेसच्या यादीत कुणाला कुठून संधी?
1) के.सी. पाडवी, अक्कलकुवा
2) राजेंद्र गावित, शहादा
3) किरण दामोदर, नंदुरबार
4) शिरीशकुमार नाईक, नवापूर
5) प्रवीण चौरे, साक्री
6) कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण
7) धनंजय चौधरी, रावेर
8) राजेश एकाडे, मलकापूर
9) राहुल बोंद्रे, चिखली
10) अमित झनक, रिसोड
11) वीरेंद्र जगताप, धामगाव रेल्वे
12) सुनील देशमुख, अमरावती
13) यशोमती ठाकूर, तिवसा
14) अनिरुद्ध देशमुख,अचलपूर
15) रणजीत कांबळे, देवळी
16) प्रफुल्ल गुडधे, नागपूर-दक्षिण पश्चिम
17) बंटी शेळके, नागपूर, मध्य
18) विकास ठाकरे, नागपूर पश्चिम
19) नितीन राऊत, नागपूर उत्तर
20) नाना पटोले, साकोली
21) गोपालदास अग्रवाल, गोंदिया
22) सुभाष धोटे, राजुरा
23) विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी
24) सतीश वारजुकर, चिमूर
25) माधवराव पवार-पाटील, हदगाव
26) तिरुपती कोंडेकर, भोकर
27) मीनल पाटील खदगावकर, नायगाव
28) सुरेश वरपुडकर, पाथरी
29) विलास औताडे, फुलंब्री
30) मुझ्झफर हुसैन, मीरा भाईंदर
31) अस्लम शेख, मालाड-पश्चिम
32) नसीम खान, चांदिवली
33) ज्योती गायकवाड, धारावी
34) अमिन पटेल, मुंबादेवी
35) संजय जगताप, पुरंदर
36) संग्राम थोपटे, भोर
37) रवींद्र धंगेकर, कसबा
38) बाळासाहेब थोरात, संगमनेर
39) प्रभावाती घोगरे, शिर्डी
40) धीरज देशमुख, लातूर ग्रामीण
41) अमित देशमुख, लातूर, शहर
42) सिद्धराम मेहेत्रे, अक्कलकोट
43) पृथ्वीराज चव्हाण, कर्हाड, दक्षिण
44) ऋतूराज पाटील, कोल्हापूर दक्षिण
45) राहुल पाटील, करवीर
46) राजू आवळे, हातकणंगले
47) विश्वजीत कदम, पलूस कडेगाव
48) विक्रमसिंग सावंत, जत
काँग्रेसच्या यादीची खासियत काय?
काँग्रेसच्या यादीत महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे विद्यमान आमदारांना दिलेली संधी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दिलेला उमेदवार. काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून प्रफुल्ल गुडधे यांना संधी दिली आहे. तसंच पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, रवींद्र धंगेकर या सगळ्या दिग्गजांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



