rajkiyalive

raju shetti news : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू : राजू शेट्टी पहिली उचल 3700 घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही

स्वाभिमानीची उस परिषद

जयसिंगपूर/प्रतिनिधी-

raju shetti news : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू : राजू शेट्टी पहिली उचल 3700 घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही : गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन 200 रूपये आणि चालू गळीत हंगामात तुटणार्‍या उसाला पहिली उचल एकरकमी 3700 रूपये घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील 23 व्या उसपरिषदेत दिला.

raju shetti news : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देवू : राजू शेट्टी पहिली उचल 3700 घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही

नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह मैदानावर ही उस परिषद झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी रोडे होते. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, 23 वर्षापुर्वी माझ्यावर झालेला हल्ला हा भ्याड होता. यावेळी मी ठरविले आहे, तुम्ही साथ द्या अथवा न द्या, मी मात्र शेतकर्यांची चळवळ मोठी करण्यासाठी लढा देत राहणार. शेतकर्यांच्या प्रश्नावर राज्यकर्त्यांना त्रास दिल्याने सरकारने अनेक गुन्हे माझ्यावर दाखल केले आहेत. तरीही मी मागे हटणार नाही.

ते म्हणाले, गतसाली 2900 रूपये घेण्यास परवडते म्हणणारे 3100 रूपये घेतले त्यावेळी जे आंदोलन जे झाले त्याला खतपाणी कोण घालते हे आम्हाला माहिती आहे. शुगर कंट्रोल ऑर्डरमध्ये दुरूस्तीचा प्रस्ताव शासनाने आणला आहे. ही दुरूस्ती झाली तर गुर्हाळघरे, खांडसरी बंद होणार आहे. याला आपला विरोध आहे. शेतकर्यांची मालमत्ता लुटली जात असताना मी एकाकीपणे लढत आहे. भूमी अधिग्रहण कायदा मंजूर करण्यासाठी मी लोकसभेत सरकारला भाग पाडले. शेतकर्यांना खड्ड्यात घालणारा हा उद्योग आहे म्हणून मी एनडीए सरकारमधून बाहेर पडलो.

शेट्टी पढे म्हणाले, सहा पदरी रस्ता बनवत असताना भूमी अधिग्रहणाबरोबर प्रति किलोमीटर 26 कोटी रूपये खर्च येणे अपेक्षित आहे. तरीही हे सरकार एक किलो मिटरचा खर्च 78 कोटी रूपये येत असल्याचे दाखवत आहेत. काही लोक आपण तालुक्यात दोन हजार कोटी रूपयांची कामे केल्याचा कांगावा करतात, त्याचे 20 टक्क्यांनी कमिशन काढले तर होणार्या मतदानापैकी 43 हजार रूपये प्रति माणशी उकळले आहेत. सरकारच्या धोरणामुळे 9 हजार रूपये प्रति क्विंटलचा सोयाबीन 3500 रूपयांनी विकला जात आहे. यामध्ये शेतकर्यांचा साडेपाच हजार रूपये प्रतिक्विंटल इतका तोटा होत आहे. मोदीचे पैसे आहे, शिंदेंचे पैसे आले, सगळे चोर आहेत. स्वार्थासाठी निवडणुका लढविताना दिसत आहेत. त्याच्या माध्यमातून न केलेल्या बदल्यांचेही पैसे उकळत आहेत. माझी झोपडी जाळण्याचा प्रयत्न केला तर शिवरीच्या फाट्याने झोडपल्याशिवाय राहणार नाही.

मी चळवळीत कधी शत्रुत्व आणत नाही. मी माझे सर्व आयुष्य चळवळीला वाहून घेतले आहे.

चळवळीला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर चौकात उघडे केल्याशिवाय राहणार नाही. उसतोडणी मजूर महामंडळाचा जनक मी आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही काम केले आहे. अर्थव्यवस्था प्रवाहित करण्याचे काम संघटना करते. सायकलीची जागा मोटारसायकलने घेतली. मोटारसायकलची जागा चारचाकी वाहनाने घेतली. शेतकर्यांना सध्या आलेले हे सोन्याचे दिवस शेतकरी चळवळीने आले आहेत. मी खासदार होण्यासाठी निवडणूक लढवत नाही. त्यावेळी मी मशाल घेतली असती तर आज खासदार म्हणून इथे बोललो असतो. या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांना मी उतरविणार आहे. ज्याच्या अंगात बोलण्याची हिम्मत आहे, त्याच्याच छातीवर बिल्ला असेल. मला दोन अंकी आमदार निवडूण द्या, विधानसभा डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. जाती धर्माच्या भिंती गाडून टाका. ज्याला घाम येतो, तो लुटला जातो. ज्याला घाम येत नाही, तो लुटारूंचा साथीदार आहे. चळवळ टिकायची असेल तर स्वार्थाला मुठमाती द्या, असेही राजू शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी सांगतील तो भाव घेतल्याशिवाय गप्प बसायचे नाही.

यावेळी सावकार मादनाईक म्हणाले, मागील तुटलेल्या उसाला 200 रूपये आणि चालू गळीत हंगामात तुटलेल्या उसाला राजू शेट्टी सांगतील तो भाव घेतल्याशिवाय गप्प बसायचे नाही. गत हंगामात जे लोक पैसे नको म्हणत होते, तेच लोक आता बँकेत पैसे घ्यायला पुढे आहेत. सध्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. यामध्ये साखर सम्राटही आहेत. चार हजार रूपये पहिली उचल जाहीर करा, निवडणूक बिनविरोध करतो, असे ते म्हणाले.

यावेळी प्रकाश पोफळे, राजेंद्र गड्ड्याण्णावर, रसिका दळगे, महेश खराडे, सुर्यभान जाधव, अजित पवार, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, पोपट मोरे, शशिकांत नाईक, विठ्ठल मोरे, जयपाल चौगुले, मिनाक्षी पाटील यांची भाषणे झाली. स्वागत शैलेश आडके यांनी केले. सूत्रसंचलन अभय भिलवडे यांनी केले.

उस परिषदेतील ठराव-

1) यंदा पावसाचे प्रमाण जास्त आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे परतीच्या पावसामुळे भात, भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे देखील झालेले नाहीत. राज्य सरकारने तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई देण्यात यावी.
2) गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपुर्वी तातडीने 200 रूपये दुसरा हप्ता देण्यात यावा.
3) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी मागणी करून देखील साखर आयुक्तांच्या नियंत्रणाखाली राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन झालेले नाहीत. राज्य सरकारने तातडीने सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करून एकाच सिस्टिममधील सॉफ्टवेअरमध्ये काटे बसवावेत.
4) राज्यातील ऊस तोडणी मुकादमांनी ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातलेला आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेच्या माध्यमातून आमचा लढा सुरू आहे. ज्या मुकादमांनी फसवले आहे, त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून ऊस वाहतूकदारांचे पैसे वसूल करून द्यावेत. अथवा मुकादमांनी पैसे बुडविलेल्या वाहनधारकांचे कर्ज माफ करावे.
5) साखर कारखाने तोडणी वाहतूक खर्चाच्या नावाखाली शेतकर्यांची लूट करीत आहेत. 200 किमी पेक्षा लांबून वाहतूक करून आणलेल्या उसाचा वाहतूक खर्च कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांवर पडत आहे. त्यामुळे वाहतूक खर्चाचे टप्पे 25 किमी. 50 किमी व त्याहून अधिक असे करावेत व तशी वजावट एफआरपीमधून करण्यात यावी. तसेच शेतकर्यांनी खुद्द तोडणी वाहतूक करून ऊस पुरवठा केल्यास कारखान्यांने पूर्ण एफआरपी शेतकर्यांना यावी.
6) शुगर ऑर्डर 1966 अ नुसार दुरूस्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारने प्रस्तावित केला आहे. या दुरूस्तीमुळे छोटी गुर्हाळघरे, खांडसरी व जॉगरी प्रकल्प बेकायदेशीर ठरवण्याची शक्यता आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयुक्तामार्फत केंद्राला दिलेला प्रस्ताव स्विकारावा म्हणजे खांडसरी, गुर्हाळघर व जॉगरी प्रकल्प यांना ऊस पुरविणार्या शेतकर्यांनाही कायदेशीर एफआरपी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्याबरोबरच खांडसरी व गूळ प्रकल्प यांनाही सिरपपासून इथेनॉल करण्याची परवानगी द्यावी.
7) राज्य सरकारने कृषि पंपाना दिलेली वीज सवलतीमध्ये एचपीची अट काढून सर्वच कृषि पंपांना बीज बील माफ करावे.
8) नाबार्डने साखर कारखान्यांना साखर तारण कर्ज 3 टक्के व्याज दराने देण्यात यावे.
9) चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एकरकमी एफआरपी सह 3700/- रूपये प्रतिटन पहिली उचल म्हणून देण्यात यावी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज