rajkiyalive

sangli vidhansabha news : गाडणार्‍यांनाच आता गाडायचे: जयश्रीताई पाटील

जनप्रवास । सांगली

sangli vidhansabha news : गाडणार्‍यांनाच आता गाडायचे: जयश्रीताई पाटील: गेल्या नऊ वर्षात कोणतेही पद नसताना काम केले जात आहे. भाऊंचा विधानसभेला दोनवेळा पराभव झाला. हा डाग पुसण्यासाठी चार महिने पायाला भिंगरी लावून काम केले, खासदारकीला साथ दिली, त्यांनी माझ्याबरोबर आहे की नाही, हे सांगणे आवश्यक होते. केवळ आपला वापर दुसर्‍याला जिंकण्यासाठी होत असेल तर आता ते होऊ देणार नाही. आपल्याला गाडणार्‍यांनाच आता गाडायचं आहे, असा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिला. या बैठकीत प्रथमच त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले.

sangli vidhansabha news : गाडणार्‍यांनाच आता गाडायचे: जयश्रीताई पाटील

काँग्रेस पक्षाकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जयश्रीताई पाटील गटाची बैठक येेथील विष्णू अण्णा भवनवर पार पडला. या मेळाव्यात त्या बोलत होते. या बैठकीला माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, डॉ. जितेश कदम, बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, सिकंदर जमादार, सुभाष खोत, माजी महापौर किशोर शहा, कांचन कांबळे, माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, माजी नगरसेवक फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, रोहिणी पाटील, अजित सूर्यवंशी, सुभाष यादव आदी उपस्थित होते.

जयश्रीताई पाटील म्हणाल्या, स्व.मदनभाऊ पाटील व स्व. विष्णूअण्णा पाटील असताना राजकारणात सर्वकाही भोगले आहे. ते मी पहिले आहे. राजकारण पिंड नसताना भाऊंच्या पश्चात कार्यकर्त्यांना सांभाळायचे म्हणून राजकारणात आले. कार्यकर्त्यांनी प्रेम दाखविले. महापौरपदाच्या निवडणुकीत हारूण शिकलगार यांना महापौर करतेवेळी केवळ दोनजणच माझ्याबरोबर होते. तरी त्यांना महापौर केले. लोकसभेच्या निवडणुकीत साथ दिली ते आज आपल्याबरोबर उभे राहणे आवश्यक होते. अनेकवेळा त्यांना विचारले पण त्यांनी सांगितले नाही. असे जर होत असेल तर कशासाठी करायचे?

स्व. मदनभाऊंच्या पश्चात अनेक कार्यकर्ते दुसर्‍या पक्षात गेले, ते सांगून जात होते. पण त्यांना कधी थांबवले नाही. तुमचे कल्याण होत असेल तर जावा, असे सांगत होते. विधानसभेला उमेदवारी मागितली. माझी उमेदवारी कशी कापली? हे कोणाला कधी माहिती होते? हे पण माहिती आहे. मी पळणारी बाई नाही. भाऊंच्या कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडायचे नाही, यासाठी मी प्रयत्न केला. शक्य ते केले. पण आपला वापर दुसर्‍याला जिंकविण्यासाठी होत असेल तर ते होऊ देणार नाही. आता आपण आपला विचार करायचा. तर कार्यकर्त्यांसाठी भाऊंचे घर 24 तास उघडे राहिल, अशी ग्वाही जयश्रीताई पाटील यांनी दिली.

माजी मंत्री प्रतिक पाटील म्हणाले, जयश्रीताई पाटील या वसंतदादा घराण्यातील आहेत. आपली सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर खा. विशाल पाटील सहभागी होती. तो माझा शब्द आहे. कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. ही ताकद म्हणजे आपली निवडणूक आहे. मदनभाऊंनी माझ्यासाठी जे केले आहे. त्याचा पांग फेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जितेश कदम म्हणाले, स्व.मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर जयश्रीताईंनी नऊ वर्षे जबाबदारी पेलत कार्यकर्ते सांभाळले आहेत. कार्यकर्ता स्वाभिमानाने जगला पाहिजे, ही भाऊंची जबाबदारी त्या पार पाडत आहेत. आमदार होणे ही त्यांची गरज नव्हती आणि नाही. केवळ दोनवेळा स्व. मदनभाऊंना लागलेला पराभवाचा डाग पुसायचा म्हणून त्या इच्छूक होत्या. पण यापुढे ते देतील तो आदेश असेल, असे त्यांनी सांगितले.

आनंदा लेंगरे म्हणाले, सर्वांनी मिळून फसवले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 267 बैठका घेतल्या. पदयात्रा काढल्या. खा. विशाल पाटील यांनी येऊन सांगायला हवे होते. ही निवडणूक हातात घ्यायला हवी होती. संजय मेंढे म्हणाले, जयश्रीताईंना मोठी ताकद देऊ. त्यांना आमदार करण्याचे स्वप्न सत्यात उतरावयाचे आहे. रत्नाकर नांगरे यांनी 2004 ची पुनरावृत्ती करायची आहे. दबावाला डगमगायचे नाही. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. सुभाष खोत, अजित सूर्यवंशी, मयूर बांगर, युनूस महात, तानाजी पाटील आदींनी भाषणे केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना गहिवरून आले.

भाषण करताना अनेकांना अश्रू अनावर…

जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्याने भाऊ समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेकांनी मत व्यक्त केले. पण मत व्यक्त करत असताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. जयश्रीताई पाटील यांनी देखील खंत व्यक्त करून दाखविली. त्यावर कार्यकर्त्यांचे डोळे पानावले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज