rajkiyalive

sangli political news : लोकसभेचा उघड प्रचार जयश्रीताईंचा भोवला, नेत्यांनी काढला काटा; घरच्यांनी पण सोडली साथ

जनप्रवास । सांगली

sangli political news : लोकसभेचा उघड प्रचार जयश्रीताईंचा भोवला, नेत्यांनी काढला काटा; घरच्यांनी पण सोडली साथ: लोकसभेच्या निवडणुकीवेळी झालेल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली. यावेळी महाविकास आघाडीच्या एका नेत्याने खा. विशाल पाटील यांचा प्रचार करू नका, अशा सूचना दिल्या, पण जयश्रीताई पाटील यांनी प्रामाणिपणे प्रचार केला. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत या नेत्यानेच काटा काढला, अशी चर्चा सुरू आहे. तर घरच्यांनी देखील साथ सोडल्याची खंत त्यांनी जयश्रीताई पाटील यांनी बोलून दाखवली. त्यामुळे त्यांना लोकसभेचा उघड प्रचार चांगलाच भोवला असल्याचे बोलले जात आहे.

sangli political news : लोकसभेचा उघड प्रचार जयश्रीताईंचा भोवला, नेत्यांनी काढला काटा; घरच्यांनी पण सोडली साथ

सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाकडे गेली. त्यावेळी खा. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली, त्यांच्या बंडखोरी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी उघडपणे साथ दिली नव्हती. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीचे काम प्रामाणिपणे केले जात होते. त्यांचे नेते व कार्यकर्ते शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. त्यावेळी प्रथम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस कमिटीजवळ जाहीर सभा झाली. या सभेवेळी काँग्रेसचे बडे नेते उघडपणे आले नव्हते. पण जयश्रीताई पाटील व्यासपीठावर आल्या.

त्यांनी दादा घराणे एक झाल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या एका नेत्याचा दूरध्वनी देखील आल्याचे त्यांनी सभेवेळी सांगितले होते. या नेत्याने महाविकास आघाडीचा प्रचार करावा, खा. विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रीय होऊ नये. या बदल्यात भविष्यात मदत करण्याची ग्वाही देखील दिली. पण जयश्रीताई पाटील यांनी प्रामाणिपणे खा. विशाल पाटील यांचा सांगली विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. अडीचशेहून अधिक बैठका घेतल्या. भविष्यातील विधानसभेची पेरणी देखील यातून केली. पण हा प्रचार महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्याला रूचला नाही. विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावेळी काटा निघालाच.

जयश्रीताई पाटील यांची दावेदारी असताना त्यांचा पत्ता कट झाला. विशेष म्हणजे घरच्या लोकांनी देखील त्यांना साथ दिली नाही. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आणण्याची जबाबदारी ज्या नेत्यांवर दिली होती. त्या नेत्याला देखील उमेदवारी जाहीर होण्याच्या चार दिवस अगोदरच कोणाला उमेदवारी मिळाली आहे, याची माहिती होती. पण या सर्व गोष्टी अंधारात ठेवल्या गेल्या. एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीत उघड प्रचार करून सांगली विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्न करणार्‍या ‘माऊली’चा घात घरच्या लोकांनी देखील केला.
मदनभाऊ पाटील गटाचा मेळावा नुकताच पार पडला.

या मेळाव्यात जयश्रीताई पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. मदत करणारे लोकच आज माझ्या पाठीशी नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेला प्रचार न करता शांत बसण्याचा निर्णय घेतला असता तर आजची परिस्थिती वेगळी असती, असे मत मदनभाऊ पाटील समर्थक व्यक्त करत आहेत.

दोन्ही राष्ट्रवादीकडून होती मोठी ऑफर…

स्व. मदनभाऊ पाटील यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली होती. भाऊंच्या निधनापूर्वी त्यांनी आ. जयंत पाटील यांच्याबरोबरच युध्द संपवले होते. त्यामुळे जयश्रीताई पाटील यांना मोठी जबाबदारी देण्याची ऑफर त्यांच्याकडून होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठी ऑफर दिली होती. मात्र लोकसभेची निवडणूक तोंडावर असल्याने दादा घराण्यातील उमेदवारांना मदत व्हावी म्हणून त्यांनी ही ऑफर धुडकावली. त्यावेळीच पक्ष सोडला असता तर आता अशी वेळ आली नसती, असा सूर भाऊ समर्थकांतून येत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज