rajkiyalive

shirol vidhansabha news : उल्हास पाटील यांच्या प्रवेशाने स्वाभिमानीला बळ शेतकरी संघटनेत नवचैतन्य: शेट्टींना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार

जयसिंगपूर/ अजित पवार

shirol vidhansabha news : उल्हास पाटील यांच्या प्रवेशाने स्वाभिमानीला बळ शेतकरी संघटनेत नवचैतन्य: शेट्टींना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार: स्वाभिमानी शेतकरी संघटनेत माजी आमदार उल्हास पाटील यांनी घरवापसी केली. यामुळे स्वाभिमानीला बळ मिळाले असून कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कारखानदारांना थोपवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकवटली आहे. या निवडणुकीत यश खेचून आणण्याकरता संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

shirol vidhansabha news : उल्हास पाटील यांच्या प्रवेशाने स्वाभिमानीला बळ शेतकरी संघटनेत नवचैतन्य: शेट्टींना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून संघटना रुजविण्याबरोबरच ती अधिक बळकट करण्यासाठी उल्हास पाटील यांनी अहोरात्र काम केले. ऊस, दूधदर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली. रस्त्यावरच्या लढाईत ते नेहमीच अग्रस्थानी राहिले. या आंदोलनामुळे शेतकर्‍यांना चांगला ऊस दर मिळाला. जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि दोन वेळा खासदार अशी वाटचाल करणार्‍या राजू शेट्टी यांच्या राजकीय प्रवासात उल्हास पाटील यांनी निभावलेली भूमिका उल्लेखनीय आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची उमेदवारी न मिळाल्याने उल्हास पाटील यांनी संघटनेशी फारकत घेतली होती. यानंतर त्यांनी शिवबंधन हातात बांधून शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला. जनमताच्या पाठबळावर ते विजयी झाले आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला.

शिरोळ तालुका हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला समजला जातो. सन 2004 च्या राजू शेट्टी यांच्या यशानंतर पुन्हा या मतदार संघात स्वाभिमानीला अपेक्षित यश मिळाले नाही, याची खंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांना आहे. गेल्या दहा वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी फारकत घेतलेल्या माजी आमदार उल्हास पाटील यांनी आता घरवापसी केली आहे. सोमवारी रात्री शिरोळ येथे त्यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेत पुन्हा छातीवर बिल्ला लावला. त्यांनी दहा वर्षानंतर राजू शेट्टी यांची गळाभेट घेतली. दुरावलेला सच्चा मावळा पुन्हा संघटनेला मिळाला. उल्हास पाटील यांना पुन्हा संघटनेत घेऊन गेल्या दहा वर्षाची मावळा गमावल्याची सल भरून काढण्यात शेट्टी यांना यश आले आहे.

सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एकतर्फी निर्णय होत असल्याचा ठपका ठेवत अनेकजन संघटनेतून काढता पाय घेत आहेत. असे असले तरी माजी आमदार पाटील यांच्या एन्ट्रीमुळे पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

राजू शेट्टी यांची प्रयत्नांची पराकाष्ठा गरजेची…

राजू शेट्टी यांनी सुरुवातीला जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले. पण शेट्टी यांच्यानंतर संघटनेचा शिरोळ तालुक्यातून एकही आमदार झालेला नाही. आता संघटना टिकवायची असेल तर बहुजन समाजातील उल्हास पाटील या उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी शेट्टी यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. विधानसभा निवडणुकीत यश संपादन केले तरच शेट्टी यांचे प्रयत्न फळास गेले असे निष्कर्ष निघतील.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज