jayant patil news : जयंत पाटलांच्या शनिवारी समडोळीसह मिरज पश्चिम भागात सभा : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. जयंत पाटील यांच्या प्रचाराला शुक्रवारी सुरूवात होते. शनिवार 2 नोव्हेंबर रोजी मिरज पश्चिम भागातील अनेक गावात त्यांच्या सभा होणार असल्याची माहिती संजयबापू पाटील आणि वैभव पाटील यांनी दिली.
jayant patil news : जयंत पाटलांच्या शनिवारी समडोळीसह मिरज पश्चिम भागात सभा
गेल्या सात निवडणुकीत विजय मिळविलेल्या आ. जयंत पाटील यांती आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा लागणार आहे. दिवाळीत ते मतदार संघात असल्याने प्रचार सुरू करणार आहेत. शनिवार दि. 2 रोजी सावळवाडी, माळवाडी, मौजे डिगज्र, तुंग येथे बैठकांचे आयोजक करण्यात आले असून, समडोळी, दुधगाव, कवठेपिरान आणि कसबे डिग्रज येथे सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेवेळी संजय पाटील नेर्ले, बाजार समितीचे सभापती वैभव पाटील, माजी सरपंच महावीर चव्हाण, बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे, सरपंच हजारे मॅडम ,दुधगावचे विलास आवटी, प्रमोद आवटी, सावळवाडीचे राहूल माणगावे, तुंगचे भास्कर पाटील, समडोळीचे माजी उपसरपंच प्रमोद ढोले, उपसरपंच अमजद फकीर, माजी उपसरपंच कृष्णात मसाले, कवठेपिरानचे सचीन पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
मिरज पश्चिम भागाचा नव्या इस्लामपूर मतदार संघात 2009 साली झाला.
तेव्हापासून जयंत पाटील या मतदार संघांचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांच्यामुळे मोठमोठी कामे या भागात झाली आहेत. पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटारी, सामाजिक सभागृह, बगीचे आदी कामे त्यांच्या माध्यमातून झाली आहेत. जयंत पाटील यांचा या भागात मोठा जनसंपर्क आहे. त्यांना माणनारा मोठा वर्ग या भागात असल्याने कायमच या भागाने मोठे मताधिक्य त्यांना दिले आहे. त्यांच्या सभेची जय्यत तयारी सर्वच गावात सुरू आहे.
शनिवार 2 नोव्हेंबर जयंत पाटील दौरा
दुपारी 2 वाजता माळवाडी येथे बैठक
दुपारी 3 वाजता सावळवाडी येथे बैठक
दुपारी 4 वाजता तुंग येथे बैठक
संध्याकाळी 5 वाजता मौजे डिग्रज येथे बैठक्र
संध्याकाळी 6 वाजता समडोळीत सभा
रात्री 7 वाजता कवठेपिरान येथे सभा
रात्री 8 वाजता दुधगाव येथे सभा
रात्री 8.30 वाजता कसबे डिग्रज येथे सभा.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.