jayant patil news : बोलण्यास काहीच नसल्याने माझा अपप्रचार, पण जनता सुज्ञ : जयंत पाटील : विरोधकांना माझ्या विरोधात बोलण्यास काहीच जागा नसल्याने ते ऊसदराचा अपप्रचार करून शेतकर्यांची दिशाभूल करीत आहेत. मात्र आमचा सुज्ञ व जागृत शेतकरी त्यांच्या अपप्रचारास बळी पडणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांनी रेठरेहरणाक्ष येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला. भाजपा महायुतीच्या सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
jayant patil news : बोलण्यास काहीच नसल्याने माझा अपप्रचार, पण जनता सुज्ञ : जयंत पाटील
जेष्ठ नेते बी.डी.पवार, दिलीपराव मोरे, ’राजारामबापू’चे संचालक दादासो मोरे, कृष्णेचे संचालक जे.डी.मोरे, माजी संचालक सुजित मोरे, अविनाश मोरे, माजी जि.प.सदस्य धनाजी बिरमुळे, सरपंच शुभांगी बिरमुळे, उपसरपंच अभिजित मोरे, जयवंत मोरे, अँड.विवेकानंद मोरे, सुरेश पंडीत पवार, उमेश पवार, बी.एन.पवार, डॉ.जयकर शिंदे, सुहास पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, माजी पं.स.सदस्या रुपाली सपाटे, युवक कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले, राज्यात जे काही चांगले साखर कारखाने चालले आहेत, त्यात आपला कारखाना आहे.
स्व.बापूंनी आपणास जो आदर्श घालून दिला आहे. त्याप्रमाणे काटकसर व पारदर्शी कारभार करीत सामान्य माणूस व शेतकर्यांचे हित साधत आहे. सध्या राज्यावर पावणे आठ लाख कोटींचे कर्ज आहे. मात्र या सरकारने सवंग लोकप्रियतेसाठी ज्या घोषणा केल्या, त्यामुळे राज्याची तिजोरी खाली झाली आहे. या सरकारने सव्वा लाख कोटींच्या कर्जाची रिझर्व्ह बँकेकडे मागणी केली आहे. म्हणजे राज्यातील प्रत्येक माणसावर 60-70 हजार रुपयांचे कर्ज केले आहे.
सुस्मिता जाधव म्हणाल्या, लोकसभेच्या दणक्यानंतर राज्यातील महिला लाडक्या बहिणी झाल्या.
मात्र महिलांच्या सुरक्षिततेचे काय? आ.जयंतराव पाटील यांनी महिलांना रोजगार आणि विविध पदावर काम करण्याची संधी दिली आहे. सुनिता देशमाने म्हणाल्या, आ.जयंतराव पाटील यांनी गेल्या 35 वर्षात तालुक्याचा शाश्वत विकास केला आहे. माजी पं.स.सदस्य सुरेश पंडीत पवार, बी.एन.पवार, डॉ.जयकर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या सभेस दामाजी मोरे, विश्वास मोरे,महेश पवार,पंकज पवार, सोसायटीचे अध्यक्ष हणमंत मोरे,केदार शिंदे, चंद्रहार पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड.विवेकानंद मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महेश पवार यांनी आभार मानले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



