tasgaon-kavtemankhal election : संजयकाका सोबतच राहण्याचा 1 हजार विद्यार्थ्यांच्या कुटुंबप्रमुखांचा निश्चय : तासगाव शहरातील नगरपरिषद शाळांचे नूतनीकरण, नवीन इमारती बांधणे, मोफत स्कूल बस, टॅब, एलईडी प्रोजेक्टर द्वारे शिक्षण अशा अनेक सुविधातून शिक्षण घेत असलेल्या तासगाव नगरपरिषद शाळेतील 1 हजार विद्यार्थ्यांचे कुटुंब विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांच्या सोबतच राहील असा निश्चय विद्यार्थ्यांच्या कुटुंबप्रमुखांनी केला आहे.
tasgaon-kavtemankhal election : संजयकाका सोबतच राहण्याचा 1 हजार विद्यार्थ्यांच्या कुटुंबप्रमुखांचा निश्चय
यापूर्वी, तासगाव नगरपरिषद शाळा भौतिक व बौद्धिक विकासापासून वंचित होत्या. संजयकाका पाटील यांनी लोकसभेच्या माध्यमातून तसेच, विशेष निधीतून तासगाव नगरपरिषद शाळांचा कायापालट केला. तब्बल सहा नव्या इमारती, स्कूल बस, अद्यावत साधने यातून भौतिक सुविधा मिळवून दिल्या. तर, टॅब व शिक्षणासाठी लागणारा एलईडी प्रोजेक्टरद्वारे बौद्धिक सुविधा मिळाल्या. यातून, नगरपरिषद शाळांच्या पट संख्येला लागलेले गळती थांबविण्यात यश आले.
अवघ्या सातशे पटसंख्येवर सुरु असलेल्या नगरपरिषदेच्या 16 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. मात्र, संजयकाका पाटील यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून सोळा शाळांपैकी अनेक शाळात दोन ते तीन खोल्या वाढवून नुतनीकरण केले. दरवर्षीच्या बजेट निधीत भरीव वाढ केली. तसेच संत, महात्म्यांचे नामकरण करुन सोळा शाळांचा कायापालट करीत भौतिक व बौद्धिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. यातून अवघ्या सातशे वरुन तब्बल चौदाशेच्या पटसंख्येवर नगरपरिषद शाळा आल्या.
सोळा शाळांमध्ये सुमारे 17 ते 18 कंत्राटी पद्धतीने शिक्षिका भरती करण्यात आल्या. यातून एक प्रकारे रोजगार उपलब्ध करुन दिला गेला. तसेच, अल्प वेतन असणारे बालवाडीच्या शिक्षकांचे वेतन सुद्धा वाढवण्यात आले. या मिळालेल्या सुविधेतून गोर-गरीब विद्यार्थी या शाळातून उद्याचे भविष्य घडत आहेत. यातून संजयकाका पाटील यांच्यासोबत राहू असा निश्चय येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबप्रमुखांनी केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.