rajendra yadravkar news : आमदार यड्रावकर यांच्या विजयासाठी भंत्ये यश काश्यपायन यांचे शुभाशीर्वाद: वैशाली बौद्ध विहार धम्म नगर जयसिंगपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ यांनी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विजयी होण्यासाठी बौद्ध समाजाच्या वतीने पाठिंबा दिला. यावेळी भंत्ये यश काश्यपायन व बौद्ध संस्कार मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
rajendra yadravkar news : आमदार यड्रावकर यांच्या विजयासाठी भंत्ये यश काश्यपायन यांचे शुभाशीर्वाद
संस्कार मंडळाचे अध्यक्ष धनंजय कर्णिक म्हणाले, तालुक्यातील विकास कामांचा डोंगर पाहता पुन्हा आपण आमदार होणार याबाबत शंका नाही. बौद्ध समाजाच्या शुभेच्छा व आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, कुरुंदवाड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे काम मार्गी लागले आहे. जयसिंगपूरात काही ठराविक लोकांच्या विरोधामुळे व जागेच्या निर्णयामुळे हे काम थांबले होते. पण नुकतेच नगरपालिकेने ठराव पूर्ण करून हे काम मार्गस्थ केले आहे.
आभार रमेश हिंदुराव कांबळे यांनी मानले.
यावेळी प्रकल्प अभियंता विद्याधर बिडकर, रजनीकांत कांबळे, अनिल सावंत, विकी गायकवाड, अभिजीत आलासकर, सुर्यकांत कांबळे, संजय शिंदे, सुशांत भोसले, श्रीकांत देसाई, आप्पासो कांबळे, स्वप्निल कांबळे, विशाल कांबळे, सुनील कांबळे, सुरज पोळे, एलिया आवळे, जॉन सकटे, मार्शल आवळे, गणेश साठे, चेतन शिकलगार यांच्यासह आप्पा ग्रुप व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



