rajkiyalive

jayant patil news : जयंत पाटलांमुळेच सर्वोदय कारखान्याचे अस्तित्व अबाधीत

कारखाना केंव्हाच बंद पडला असता,  सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या प्रतिक्रिया

dineshkumar aitawade 9850652056

jayant patil news : जयंत पाटलांमुळेच सर्वोदय कारखान्याचे अस्तित्व अबाधीत: राज्याचे नेते, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेळीच सर्वोदय कारखान्यात हस्तक्षेप करून कारखाना वाचविला. त्यांच्यामुळेच सध्या कारखाना जोमात सुरू असून परिसरातील शेतकर्‍यांचे उस वेळेत जाते याचा फायदा परिसरातील शेतकर्‍यांनाच जास्त झाल आहे, अशा प्रतिक्रीया वाळवा आणि मिरज पश्चिम भागातील शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहेत.

jayant patil news : जयंत पाटलांमुळेच सर्वोदय कारखान्याचे अस्तित्व अबाधीत

चार वेळा सांगलीचे आमदार राहिलेल्या संभाजीआप्पा पवार आणि व्यंकाप्पा पत्की यांनी पुढाकार घेवून कारंदवाडी येथे सर्वोदय कारखाना सुरू केला. त्यावेळी जयंत पाटील यांचे त्यांना मोठे सहकार्य मिळाले. कालांतराने कारखाना सुरू ठेवणे सत्ताधार्‍यांना अवघड झाले. शेतकर्‍यांना वेळेत बिले मिळेणात त्यामुळे शेतकरीही कारखान्याला उस पाठवेनात. त्यामुळे कारखाना अडचणीत आला. कारखान्यावर भरपूर कर्ज झाले. कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि व्यवस्थापनाने त्यावेळी जयंत पाटील यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. जयंत पाटील त्यावेळी मंत्री होते.

जयंत पाटील यांनी सर्व बँकांना बोलावून माहिती घेतली. सर्व कर्ज वन टाईम सेंटलमेंट करून भागविण्याचे ठरले.

त्यावेळी ही सर्व रक्कम राजारामबापू कारखान्याचे भागविण्याचे ठरले. व दोन वर्षानंतर रक्कम परत घेण्याचे ठरले. त्यावेळी जर जयंत पाटील यांनी पुढाकार घेवून कारखाना वाचविला. नाहीतर आज परिस्थिती वेगळी असती अशा प्रतिक्रीया या भागातील सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत.

सध्या या कारखान्यात याच भागातील कित्येक कामगार काम करीत आहेत.

अनेकांचे संसार या कारखान्यावर फुलले आहेत. अनेकांना आयुष्याची भाकरी मिळाली आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांनाही आपल्या हक्काचा कारखाना वाटत आहे. राजारामबापूचे तीन युनिट असल्याने शेतकर्‍यांना उस पाठविणे सोपे जात आहे. उसाला जिल्ह्यात सर्वात जास्त बिलही मिळत आहे.

राजारामबापू कारखाना केवळ उस नेत नाही तर उसाच्या लागणीपासून तोडणीपर्यंत सर्व साहित्य पुरवते.

खते, औषधे किफायतशीर किंमतीत देत असल्याने शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या हंगामामध्ये निवडणुकीमुळे हंगाम पुढे गेला आहे. पावसाळाही जास्त झाल्याने उसाच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मिरज पश्चिम भागात कारंदवाडीत असलेल्या या कारखान्यामुळे शेतकर्‍यांना मोठा हातभार लागला असल्याचे अनेक सर्वसामान्य शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज