rajkiyalive

sangli vidhansabha election news : सांगली जिल्ह्यातील आठ जागांसाठी 70 टक्के मतदान

किरकोळ वादावादी वगळता मतदान शांततेत, दिग्गजांसह 99 जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद, शनिवारी मतमोजणी

sangli-vidhansabha-election-news-70-percent-voting-for-eight-seats-in-sangli-district: जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागांसाठी बुधवारी सरासरी — टक्के मतदान झाले. बहुतांशी मतदारसंघात चुरशीची लढत असल्याने किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. शहरीसह ग्रामीण भागात उत्साह दिसून आला. जिल्ह्यात 21 ठिकाणी मतदान मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ प्रक्रिया रखडली. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आ. जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. मानसिंगराव नाईक, आ. सुधीर गाडगीळ, आ. विक्रमसिंह सावंत, आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह 99 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. शिराळा मतदारसंघात सर्वाधिक — टक्के तर सांगलीत सर्वात कमी — टक्के मतदानाची नोंद झाली. शनिवारी (दि. 23) रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान गत निवडणुकीपेक्षा यंदा पाच टक्क्यांनी मतदानात वाढ झाली. त्यामुळे वाढलेला टक्का कुणाला धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

sangli vidhansabha election news : सांगली जिल्ह्यातील आठ जागांसाठी 70 टक्के मतदान

विधानसभेच्या आठ जागांसाठी जिल्ह्यातील 2 हजार 482 मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत होत असल्याने बहुतांशी मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी थंडी असल्याने पहिल्या तीन तासात मतदारात निरुत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्र ओस पडली होती. पहिल्या दोन तासात अवघ्या 6.14 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर मतदानाला गती आली.

अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नवीन मतदारासह महिला आणि पुरुष मतदारांत उत्साह दिसत होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत 18.55 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर काही काळ मतदानाची हीच गती राहिली. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे 33.50 टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान 48.39 टक्क्यांपर्यंत पोहोचले. दुपारनंतर मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडल्याने मतदान केंद्रावर रांगा होत्या. त्यामुळे सहा वाजल्यानंतर मतदान केंद्रावर रागा होत्या. शेवटच्या तीन तासांमध्ये वीस टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली.
21 ठिकाणच्या मतदान यंत्रात बिघाड

मतदान सुरू असताना जिल्ह्यातील 21 ठिकाणच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला. 21 व्हीव्हीपॅट बंद पडली होती. बटण दाबल्यानंतर व्हीव्हीपॅटची चिठ्ठी दिसत नसल्याच्या मतदारांनी तक्रारी केल्या. 14 बॅलेट युनिट तर 12 कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. मतदान यंत्र बंद पडल्याने काही काळ मतदानाची प्रक्रिया रखडली. मात्र तात्काळ दुसरे यंत्र उपलब्ध करून मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

सात आमदारांसह99 जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

आठ विधानसभा मतदारसंघात सात विद्यमान आमदारांसह 99 जण निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सांगली, खानापूर आणि जत विधानसभा मतदारसंघात पक्षाअंतर्गत बंडखोरी झाल्याने तिरंगी लढत होती. त्यामुळे या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय उर्वरित पाच मतदारसंघांमध्ये काट्याची लढत आहे. सांगलीत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ विरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष जयश्रीताई पाटील अशी काट्याची लढत झाली. खानापुरात एकनाथ शिंदे शिवसेनेचे सुहास बाबर यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे वैभव पाटील आणि पवार राष्ट्रवादीचे बंडखोर माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख अशी तिरंगी तर जत मतदारसंघात काँग्रेसचे आ. विक्रमसिंह सावंत यांच्या विरुद्ध भाजपचे आ. गोपीचंद पडळकर आणि भाजप बंडखोर तम्मनगौडा रवि-पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली.

इस्लामपुरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील तर शिराळ्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आ. मानसिंगराव नाईक विरोधात भाजपचे सत्यजित देशमुख अशी दुरंगी लढत झाली. पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसचे आ. विश्वजीत कदम विरोधात भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात चुरशीने लढत झाली. तासगाव-कवठेमहांकाळला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे रोहित पाटील आणि अजितदादा राष्ट्रवादीचे माजी खासदार संजयकाका पाटील अशी दुरंगी काट्याची लढत झाली आहे. मिरजेत भाजपचे नेते व पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना तानाजी सातपुते यांच्यात दुरंगी लढत झाली.
कार्यकर्त्यांची चुरस आणि वादावादी

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदानाची प्रक्रियवेळी चार जणांवर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. चिंचणी वांगीत बुथ एजंट, सांगली शहरात उमेदवाराचा जुनी व्हिडीओ सोशल मिडीयातून व्हायरल केल्याने तसेच अन्य दोन ठिकाणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक मतदारसंघात काट्याची लढत असल्याने मतदारांना खेचण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू होती. कार्यकर्त्यांनी खाजगी वाहनाद्वारे शेवटच्या टप्प्यापर्यंत जास्तीत-जास्त मतदारांना खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले.

शिराळामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात — टक्के मतदानाची नोंद झाली असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले. शिराळा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक — टक्के मतदान झाले तर सांगली मतदारसंघात सर्वात कमी — टक्के मतदानाची नोंद झाली.

प्रशासनाची चोख व्यवस्था

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 25 लाख 36 हजार 65 मतदार असून 2482 मतदान केंद्रावर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान यंत्रे त्याची पाहणी केली.

दिव्यांग, महिलांसाठी विशेष केंद्राव्दारे सेवा

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला, दिव्यांगासाठी विशेष मतदान केंद्र होते. त्याठिकाणी महिलांचा उत्साह दिसून आला. दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक केंद्रावर व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मतदारांची गैरसोय टळली मतदानापूर्वी वॉटर स्लीप यांचे वाटप करण्यात आले होते. मात्र ज्यांना स्लीप मिळाली नाही. त्यांनी 1950 टोल फ्री क्रमांकावर मतदारांनी मतदानाचा क्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती घेतली. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज