sangli crime news : खोटे लग्न लावून तरुणांची फसवणूक करणारी महिलांची टोळी जेरबंद : दिड लाखांचा घातला गंडा : एजंटसह चौघांना केली अटक. ” सांगली : शहरातील एका परिसरात राहणार्या तरुणाची खोटे लग्न लावून महिलेचे पहिले लग्न झालेले असताना अन्य चौघांच्या मदतीने दिड लाख रुपयांना गंडा घातला. त्याचबरोबर मुस्लिम असून हिंदू असल्याचे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार देखील उघडकीस आला. सदर फसवणुकीची घटना दि. 09 सप्टेंबर 2024 ते रविवार दि. 08 डिसेंबर 2024 या कालावधीत घडली. याप्रकरणी कृष्णा सुभाष जाधव (वय 35, रा. पंचशीलनगर, मंडगुळे प्लॉट झोपडपट्टी, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
sangli crime news : खोटे लग्न लावून तरुणांची फसवणूक करणारी महिलांची टोळी जेरबंद : दिड लाखांचा घातला गंडा : एजंटसह चौघांना केली अटक.
फसवणूक करणार्या संशयित पाच महिलांना पोलिसांनी जेरबंद केले. पल्लवी मंदार कदम (मूळ नाव : परवीन मोदीन मुजावर. रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर ), एजंट – राणी उर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार (रा. पंचशीलनगर), राधिका रतन लोंढे (रा. मिरज ), सुमन दयानंद वाघमारे (रा. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी कृष्णा जाधव हा खाजगी नोकरी करतो तो आपल्या कुटुंबियांसह पंचशीलनगर येथील मंडगुळे प्लॉट येथे राहतो. संशयित पाच जणांनी संगनमत करुन परवीन मुजावर हिचे लग्न झालेले असताना देखील फिर्यादी कृष्णा समवेत तिचे दुसरे लग्न लावून दिले. याकरिता फिर्यादीकडून दिड लाख रुपये घेतले. ही बाब काही दिवसांनी फिर्यादी कृष्णा जाधव यांच्या समजली. वास्तविक संशयित पल्लवी उर्फ परवीन हिचे पहिले लग्न मंदार कदम याच्यासमवेत झाले होते. मात्र, ही बाब संशयितांनी फिर्यादी कृष्णा जाधव याच्यापासून लपवून ठेवली.
परवीन ही मुस्लिम धर्माची असून देखील पल्लवी कदम या नावाने स्वत:ची ओळख लपविली असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच कृष्णा जाधव याने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी संशयित पाच महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याच पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का याबाबत पोलिसांनी तपास केला.
यावेळी अशाच प्रकारची तक्रार काजल पाटील (मूळ नाव करिष्मा हसन सय्यद रा. कोल्हापूर) हिच्या विरोधात दीपक भोसले (रा. पाटोदा जि. बीड) यांनी दिली होती. या प्रकरणातील संशयित काजल सागर पाटील (मूळ नाव करिष्मा सय्यद), एजंट सारिका दीपक सुळे (रा. सांगली), अजित अप्पा खरात (रा. वानलेसवाडी) आणि कमल अनिल जाधव (रा. माधवनगर) यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेत पुढील तपासासाठी बीड पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे, सहाय्यक निरीक्षक किरण स्वामी, उपनिरीक्षक ज्योतिबा भोसले, कर्मचारी विनोद साळुंखे, संतोष पुजारी, नवनाथ देवकाते, कपिल साळुंखे, सुशांत लोंढे, शशिकांत भोसले यांच्या पथकाने केली

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



