rajkiyalive

sangli news : बसर्गीत जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प

चार मेगावॅट क्षमता, 1100 शेतकर्‍यांना दिवसा वीजपुरवठा सुरु

sangli news : बसर्गीत जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प : शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून सांगली जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसर्गी (ता. जत) येथे कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे बसरगी, सिंंदूर व गुगवाड या गावांतील 1100 शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा होणार आहे.

sangli news : बसर्गीत जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प

कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पंंतप्रधान कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजना राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणार्‍या 16 हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे.

मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सांगली जिल्ह्यात 34 ठिकाणी क्षमता 207 मेगावॅट क्षमता असलेले सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 75 कृषी वाहिन्यांवरील शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.

वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीला दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणार्‍या अडचणी दूर करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

सौर प्रकल्प उभारणीत जिल्हा प्रशासनाचे मदत

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांचे व त्यांच्या संपूर्ण प्रशासनाचे सहकार्य मिळाले. जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषदेचेही विशेष सहकार्य लाभले. सौर प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणार्‍या ग्रामपंचायतींना शासनाकडून एकरकमी पाच लाख अनुदान देण्यात येत असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज