sangli crime news : उमदीत वसुलीचे पैसे लुटणार्या एकास केले जेरबंद : चौघेजण झाले पसार :: सांगली : कर्जाचे हप्ते वसूल करून निघालेल्या इंडी पतसंस्थेच्या कर्मचार्यांना रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सव्वा लाख रुपये लुटणार्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले असून अन्य चौघेजण पसार झाले आहेत. सचिन परशुराम कांबळे (वय 24 रा. लवंगा ता. जत) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोत्याव बोबलाद येथे सदरची कारवाई केली. सुनील तानाजी लोखंडे, सचिन महादेव बिराजदार-पाटील, परशुराम कांतु कांबळे आणि हंजाप्पा मांग (सर्व रा. लवंगा) अशी पसार झालेल्यांची नावे असून त्यांचा शोध सुरु असल्याचं पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.
sangli crime news : उमदीत वसुलीचे पैसे लुटणार्या एकास केले जेरबंद : चौघेजण झाले पसार :
याबाबत अधिक माहिती अशी कि, इंडी पतसंस्थेच्या चडचण शाखेमध्ये फिर्यादी श्रीधर सुब्बाराय बगली हे कर्जाचे हप्ते वसूल करण्याचे काम करतात तर पालकशी मनोहर व्यंकटची हे मॅनेजर म्हणून काम करतात. श्रीधर बगली आणि त्यांचे मॅनेजर व्यंकटची हे दोघेजण बुधवार दि. 04 डिसेंबर रोजी जत तालुक्यातील गिरगाव मधील लोकांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी आले होते. दिवसभरात 1 लाख 15 हजार रुपये वसूल करून सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून दोघे निघाले होते.
यावेळी संशयितांनी दोघांना वाटेत अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूचा धाक दाखवत दोघांकडे पैशांची बॅग घेऊन पळून गेले होते. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्हयाची उकल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचारी नागेश खरात यांना माहिती मिळाली कि, लवंगा गावातील सचिन कांबळे, सचिन बिराजदार-पाटील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केला असून त्यातील कांबळे हा कोत्याव बोबलाद चौकात आला आहे.
मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्यांनी त्याठिकाणी छापा टाकून त्यास जेरबंद केले. गुन्ह्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अन्य साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी उमदी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, संदीप कांबळे, संदीप गुरव, नागेश खरात, सतीश माने, दरिबा बंडगर, अमर नरळे, विक्रम खोत यांच्या पथकाने केली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



