kolhapur crime news : आकिवाटमधून वाहून गेलेल्या बैरागदार यांचा मृतदेह 4 महिन्यांनी आढळला : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अकीवाट (ता. शिरोळ) येथील ऑगस्ट महिन्यातील महापुरात एक ट्रॅक्टर अपघातात वाहून गेल्याची घटना घडली होती. यात इकबाल बाबासो बैरागदार (वय 56) हे देखील वाहून गेले होते. दरम्यान या घटनेनंतर यांच्या मृतदेहाचे अवशेष कर्नाटकातील इंगळी (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे कृष्णा नदीच्या पात्रात सापडला आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल, सुपारीच्या डब्याने आणि कपड्यांवरील खुणांवरून त्यांची ओळख पटली आहे.
kolhapur crime news : आकिवाटमधून वाहून गेलेल्या बैरागदार यांचा मृतदेह 4 महिन्यांनी आढळला
4 महिन्यांनी आढळला मृतदेह, केवळ हाडाचा सांगाडाच
मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट 2024 रोजी बैरागदार आणि त्यांचे सहकारी ट्रॅक्टरने बस्तवाड शेताकडे जात असताना पुलावरून ट्रॅक्टर नदीत कोसळला होता. या अपघातात चार जण बचावले, तर सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आण्णासाहेब हसुरे आणि इकबाल बैरागदार वाहून गेले होते. हसुरे यांचा मृतदेह तीन दिवसांत सापडला, मात्र बैरागदार यांचा शोध लागला नव्हता.
शासनाने शोधमोहीम थांबवल्यानंतर बैरागदार यांचे नातेवाईक खचले नाहीत. त्यांनी चार महिन्यांपासून कृष्णा नदीकाठावर पत्रके वाटणे, प्रसिद्धीमाध्यमांतून माहिती देणे, आणि चौकशी करणे असे प्रयत्न सुरू ठेवले. मंगळवारी इंगळी येथे मृतदेहाचे अवशेष सापडल्याचे समजताच नातेवाईकांनी ओळख पटवली. अशातच आता बैरागदार यांच्या मृतदेहावर अकिवाट येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



